बंगळुरु : सध्या प्रो कबड्डी लीगचा आठवा हंगाम ( Pro Kabaddi League Season Eight ) खेळला जात आहे. या स्पर्धेबाबत आयोजकांनी बुधवारी महत्वाची घोषणा केली आहे. ज्यामध्ये प्रो कबड्डी लीगच्या आठव्या हंगामाच्या अंतिम सामन्याची तारीख जाहीर केली आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना 25 फेब्रुवारीला खेळला जाणार आहे.
प्रो कबड्डी लीगच्या आठव्या हंगामाचा अंतिम सामना ( Pro Kabaddi League Final Match ) 25 फेब्रुवारीला खेळला जाणार आहे. या अगोदर स्पर्धेतील दोन प्लेऑफ सामने 21 आणि 23 फेब्रुवारीला खेळले जाणार आहेत. आयोजकांकडून एक प्रेस रिलीज काढून याबाबत माहिती देण्यात आली आहे. या प्रेस रिलीज मध्ये सांगण्यात आले आहे की, सहा संघ स्पर्धेच्या ट्राफीसाठी लढताना दिसतील.