महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

प्रो कबड्डी : गुजरात फॉर्च्यूनजायंट्सची दणक्यात सुरुवात; बुल्सचा 42-24 ने केला पराभव

सामन्यात बुल्सचे स्टार चढाईपटू रोहित कुमार (4) आणि पवन सेहरवात (8) यांना अपेक्षित कामगिरी करता आली नाही. त्यामुळे संघाला पराभूत व्हावे लागले.

प्रो कबड्डी : गुजरात फॉर्च्यूनजायंट्स फार्मात, बुल्सचा 42-24 ने केला पराभव

By

Published : Jul 21, 2019, 9:25 PM IST

हैदराबाद- प्रो कबड्डीच्या सातव्या हंगामातील तिसऱ्या सामन्यात गुजरात फॉर्च्यूनजायंट्सने बेंगलुरू बुल्सचा एकतर्फी पराभव केला. गुजरात फॉर्च्यूनजायंट्सने बुल्सला 42-24 अशा फरकाने हरवत स्पर्धेत विजयी सुरूवात केली.

पहिल्या हाफमध्ये दोन वेळा अंतिम फेरीत धडक मारलेल्या गुजरात फॉर्च्यूनजायंट्सने 21-10 अशी बढत घेतली. संपूर्ण हाफमध्ये गुजरातच्या संघाचा दबदबा होता. त्यांनी बुल्सना दोन वेळा ऑलआउट केले.

दुसऱ्या हाफमध्येही गुजरातने आपले आक्रमण सुरूच ठेवले. मात्र, दुसऱ्या हाफमध्ये बुल्सचे स्टार चढाईपटू पवन सेहरवातने सुपर चढाईमध्ये 4 गुण घेत संघाला सामन्यात परत आणले होते. मात्र, गुजरातच्या बचावफळीने पवनला दोन वेळा बाद केले.

सामन्यात बुल्सचे स्टार चढाईपटू रोहित कुमार (4) आणि पवन सेहरवात (8) यांना अपेक्षित कामगिरी करता आली नाही. त्यामुळे संघाला पराभूत व्हावे लागले.

गुजरात फॉर्च्यूनजायंट्सचा पुढील सामना शुक्रवारी 26 जुलैला युपी योध्दाशी होणार आहे. तर बेंगलुरु बुल्स 28 जुलैला यू मुंबाविरुध्द भिडणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details