महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

Premier Handball League : महाराष्ट्र आयर्नमनने जिंकली पहिली प्रीमियर हँडबॉल लीग स्पर्धा, अंतिम सामन्यात गोल्डन ईगल्स युपीचा पराभव केला

महाराष्ट्र आयर्नमेनने पहिल्या प्रीमियर हँडबॉल लीगचे विजेतेपद पटकावले आहे. त्यांनी अंतिम सामन्यात गोल्डन ईगल्स उत्तर प्रदेशचा 38-24 असा पराभव केला.

Premier Handball League
प्रीमियर हँडबॉल लीग

By

Published : Jun 26, 2023, 3:40 PM IST

महाराष्ट्र आयर्नमनने जिंकली पहिली प्रीमियर हँडबॉल लीग स्पर्धा

नवी दिल्ली :जयपूर येथे रविवार, 25 जून रोजी झालेल्या प्रीमियर हँडबॉल लीगच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्र आयर्नमॅनने गोल्डन ईगल्स उत्तर प्रदेशचा 38-24 असा पराभव केला. यासह महाराष्ट्र आयर्नमेन प्रीमियर हँडबॉल लीगच्या पहिल्या सीझनचा चॅम्पियन ठरला. आयर्नमेन संघाने संपूर्ण सामन्यात विरोधी संघावर आपले वर्चस्व कायम राखले. आयर्नमेनच्या इगोर चिसेलिओव्हने ईगल्सवर जोरदार हल्ले चढवले. उत्तर प्रदेशच्या ओमिद रझाने काही चमकदार बचाव करत आपल्या संघाला सामन्यात कायम राखले. मात्र संघाला विजय मिळवता आला नाही.

दुसऱ्या हाफमध्ये आयर्नमनचे आक्रमण : हाफ टाइमपर्यंत स्कोअर 16-12 असा महाराष्ट्र आयर्नमनच्या बाजूने होता. गोल्डन ईगल्स यूपीने ब्रेकनंतर अधिक आक्रमक पवित्रा दाखवला. जलाल कियानी, अंकित आणि मनजीत यांच्या हल्ल्यांमुळे आयर्नमॅनला आघाडीवर जास्त फरक पडला. दुसऱ्या हाफच्या मध्यंतराला आयर्नमॅनने 26-15 असा स्कोअर करत सामन्यावर पकड घेतली. आयर्नमॅन्सने गोल्डन ईगल्सचा बचाव सहजतेने मोडून काढला. ईगल्सचे खेळाडू मैदानावर पराभूत दिसत होते. शेवटच्या काही मिनिटांपर्यंत आयर्नमॅन खेळाडूंनी गोल्डन ईगल्सवर वर्चस्व मिळवले होते.

विजयाचे श्रेय उत्कृष्ट तयारीला दिले : आयर्नमॅन खेळाडूंनी आपल्या विजयाचे श्रेय उत्कृष्ट तयारीला दिले. अंतिम फेरीत आपल्या संघाच्या पराभवाबद्दल बोलताना गोल्डन ईगल्स उत्तर प्रदेशचे सुखबीर सिंग म्हणाले की, प्रीमियर हँडबॉल लीग देशात या खेळाला लोकप्रिय करण्यासाठी महत्वाची ठरेल. इगोर चिसेलिओव्ह आणि जलाल कियानी यांनी अंतिम फेरीत महाराष्ट्र आयर्नमेनकडून सर्वाधिक (प्रत्येकी 11) गोल केले. या सामन्यात गोल्डन ईगल्ससाठी सुखवीर सिंग ब्रारने सर्वाधिक 10 गोल केले.

स्पर्धेतील पुरस्कार विजेते : चिसेलिओव्हला 'मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर ऑफ द मॅच'चा किताब देण्यात आला. संपूर्ण लीगमध्ये 102 गोल केल्याबद्दल गोल्डन ईगल्स उत्तर प्रदेशच्या सुखवीर सिंग ब्रारला गोल्डन बॉल देण्यात आला. तसेच ब्रारला मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर ऑफ द सीझनचा पुरस्कार देण्यात आला. राहुल टी.के. ने संपूर्ण स्पर्धेत 184 गोल वाचवले. त्याने गोल्डन ग्लोव्ह जिंकला.

हेही वाचा :

  1. Lionel Messi Birthday : फुटबॉलचा जादूगार झाला 36 वर्षांचा!, जाणून घ्या लिओनेल मेस्सीची कारकिर्द
  2. Raina Restaurant : सुरेश रैना युरोपातील लोकांना भारतीय पदार्थ घालणार खाऊ! अ‍ॅमस्टरडॅममध्ये उघडले रेस्टॉरंट

ABOUT THE AUTHOR

...view details