महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

BWF World Championships वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये प्रणीतचा पराभव, तर अश्विनी आणि सिक्की विजयी - sports latest news

प्रणीतला जागतिक क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर असलेल्या चायनीज तैपेईच्या चो तिएन चेनने 15-21, 21-15, 15-21 असे पराभूत केले Praneeth losses Ashwini Sikki win. 2019 मध्ये झालेल्या BWF वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये प्रणीतने कांस्यपदक पटकावले होते.

praneeth
प्रणीत

By

Published : Aug 22, 2022, 6:09 PM IST

टोकियो बीडब्ल्यूएफ वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या BWF World Championships पहिल्या दिवशी बी साई प्रणीतला सोमवारी तीन गेमच्या अटीतटीच्या सामन्यात पराभव पत्करावा लागला. तर महिला दुहेरी आणि मिश्र दुहेरीत भारतीय खेळाडूंनी बाजी मारली. जागतिक चॅम्पियनशिपमध्ये, 2019 कांस्यपदक विजेत्या प्रणीतने जागतिक क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर असलेल्या चायनीज तैपेईच्या चो तिएन चेनला Taipei's Cho Tien Chen defeated Praneeth कडवी झुंज दिली, पण शेवटी 15-21, 21-15, 15-21 असा पराभव पत्करावा लागला.

टोकियोमध्ये प्रणीतचे सलग दुसरे वर्ष निराशाजनक होते. गतवर्षी ऑलिम्पिक स्पर्धेतही तो सुरुवातीला बाहेर पडला होता. दरम्यान, माजी राष्ट्रकुल स्पर्धेतील कांस्यपदक विजेत्या अश्विनी पोनप्पा आणि एन सिक्की रेड्डी Ashwini Ponnappa and N Sikki Reddy won यांनी महिला दुहेरीच्या दुसऱ्या फेरीत मालदीवच्या अमिनाथ नबिहा अब्दुल रज्जाक आणि फातिमाथ नबाहा अब्दुल रज्जाक यांचा 21-7, 21-9 असा पराभव केला.

अश्विनी आणि सिक्की यांना दुसऱ्या फेरीत चेन किंग चेन आणि जिया यी फॅन या अव्वल मानांकित चीनच्या जोडीचे कडवे आव्हान असेल. मिश्र दुहेरीत तनिषा क्रास्टो आणि इशान भटनागर या जोडीने जर्मनीच्या पॅट्रिक शिल आणि फ्रांझिस्का वोल्कमन यांच्यावर 29 मिनिटांत 21-13, 21-13 असा विजय मिळवून आपल्या मोहिमेची सकारात्मक सुरुवात Praneeth losses Ashwini Sikki win केली. भारतीय जोडीचा पुढील सामना थायलंडच्या सुपाक जोमकोह आणि सुपिसारा पावसंप्राण या 14व्या मानांकित जोडीशी होणार आहे.

हेही वाचा -India Vs Zimbabwe 3rd Odi शुभमन गिलने झळकावले वनडे कारकिर्दीतील पहिले शतक, झिम्बाब्वेसमोर 290 धावांचे लक्ष्य

ABOUT THE AUTHOR

...view details