नाशिक - धावपटू कविता राऊत, संजीवनी जाधव आणि मोनिका आथरे पाठोपाठ आता नाशिकच्या धावपटू पूनम सोनुने हिने देखील नाशिकच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. पूनमने तामिळनाडू येथे सुरू असलेल्या १७ व्या अॅथलेटिक फेडरेशन चषक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले.
तामिळनाडू येथील तिरुवन्नामलाईमध्ये १७ व्या अॅथलेटिक फेडरेशन चषक राष्ट्रीय कनिष्ठ अजिंक्यपद स्पर्धा सुरू आहेत. या स्पर्धेत पूनम सोनुने हीने ३ हजार मीटर धावण्याच्या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. या स्पर्धेचे तामिळनाडू येथील फेडरेशन ऑफ इंडियाच्यावतीने २४ ते २६ सप्टेंबर या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे.
हेही वाचा -विश्व कुस्ती चॅम्पियनशीप : मराठमोळ्या राहुल आवारेने जिंकले कांस्यपदक