नवी दिल्ली - अशियाई चॅम्पियन बॉक्सिंगपटू पूजा राणी (७५ किलो ) हिने स्पेनच्या कास्टेलोन येथे सुरू असलेल्या ३५व्या बॉक्सेम आंतरराष्ट्रीय स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली आहे. तर दुसरीकडे दोन वेळची जागतिक कास्य पदक विजेती लवलीना बोरगोहेन (६९) हिचा उपांत्यपूर्व फेरीत पराभव झाला.
बुधवारी उशिरा रात्री झालेल्या सामन्यात राणीने इटलीच्या असुंताकॅनफोरा हिचा पराभव केला. याआधी भारताची स्टार बॉक्सिंगपटू एमसी मेरी कोम ही ५१ किलो, सिमरनजीत कौर (६० किलो) आणि जास्मीन (५७ किलो) या आपापल्या वजनी गटात अंतिम चारमध्ये दाखल झाल्या आहेत.