नवी दिल्ली - भारतात प्रथमच आलेल्या नॅशनल बास्केटबॉल असोसिएशन म्हणजेच एनबीएचे पंतप्रधान नरेंद्र मोंदींनी कौतुक केले. एनबीएमुळे 'फिट इंडिया मुवमेंट' या अभियानाला प्रोत्साहन मिळणार असल्याचे मोंदींनी म्हटले आहे.
मोदी म्हणतात, एनबीएमुळे फिट इंडिया मुव्हमेंटला प्रोत्साहन मिळेल
मोंदीनी आपल्या ट्विटमध्ये एनबीएचे कौतुक केले. 'तरुणांमध्ये बास्केटबॉल हा प्रसिद्ध खेळ आहे. कालचा दिवस हा अमेरिका आणि भारतासाठी ऐतिहासिक होता. मुंबईने भारतासाठी प्रथमच होत असलेल्या एनबीएचे यजमानपद सांभाळले. इंडियाना पेसर्स आणि सॅक्रेमेंटो किंग्स या एनबीएच्या दोन दिग्गज संघांतील सामन्यासाठी शुभेच्छा. एनबीएमुळे आपल्याला एक चांगला मंच लाभला असून 'फिट इंडिया मुवमेंट' या अभियानाला प्रोत्साहन मिळणार आहे', असे मोदींनी या ट्विटमध्ये म्हटले आहे.

इंडियाना पेसर्स आणि सॅक्रेमेंटो किंग्स या एनबीएच्या दोन दिग्गज संघांनी मुंबईतील प्री-सीजन सामन्यात सहभाग नोंदवला होता. या दोन्ही सामन्यात इंडियाना पेसर्स संघाचे वर्चस्व राहिले. त्यांनी पहिल्या सामन्यात किंग्सवर १३२-१३१ तर, दुसऱ्या सामन्यात १३०-१०६ अशा फरकाने विजय मिळवला आहे.