नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टोकियो पॅरालिम्पिक चॅम्पियन अवनी लेखरा हिचे फ्रान्समधील चटियारो येथे पॅरा नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल अभिनंदन केले ( PM Modi Congratulates Avani and Sriharsha ) आहे. तसेच तिची ही कामगिरी "ऐतिहासिक" असल्याचे म्हटले आहे. नेमबाजीत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी श्रीहर्ष देवारेड्डी यांचेही अभिनंदन केले.
लेखराने मंगळवारी महिलांच्या 10 मीटर एअर रायफल स्टँडिंग SH1 स्पर्धेत विश्वचषक स्पर्धेत 250.6 च्या विश्वविक्रमासह सुवर्णपदक जिंकले. 2024 च्या पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरण्यासाठी वीस वर्षीय अवनीने 249.6 चा स्वतःचा विश्वविक्रम मोडला ( Avani broke his own world record ). एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले, 'ऐतिहासिक कामगिरीसाठी अवनी लेखरा हिचे अभिनंदन. तुम्ही अशाच प्रकारे नवीन उंची गाठत राहा आणि इतरांना प्रेरणा देत राहा. माझ्या शुभेच्छा.