नागपूर -प्राचार्यांच्या मनमानीविरोधात एल्गार पुकारणाऱ्या मानकापूर येथील क्रीडा प्रबोधिनीच्या खेळाडूंनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. यावेळी खेळाडूंनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन मुलभूत सोयीसुविधांची मागणी केली.
नागपूर येथील सरकारच्या क्रीडा प्रबोधिनीविरुद्ध खेळाडूंचा एल्गार! - district office
महाराष्ट्र शासनाच्या नागपूर येथील निवासी क्रीडा प्रबोधिनीत संपूर्ण राज्यातील 38 ऍथलिट्स व हॅण्डबॉलपटू वास्तव्यास आहेत. मात्र, त्यांना आवश्यक सोयीसुविधा मिळत नसल्याचे खेळाडूंचे म्हणणे आहे.
महाराष्ट्र शासनाच्या नागपूर येथील निवासी क्रीडा प्रबोधिनीत संपूर्ण राज्यातील 38 ऍथलिट्स व हॅण्डबॉलपटू वास्तव्यास आहेत. मात्र, त्यांना आवश्यक सोयीसुविधा मिळत नसल्याचे खेळाडूंचे म्हणणे आहे. त्यांची मुख्य तक्रार निकृष्ठ जेवणाबद्दलची आहे. खेळाडूंच्या मते, क्रीडा प्रबोधिनीत मिळणारा नाश्ता व जेवण एकदमच सुमार दर्जाचे असते. याशिवाय भोजन कक्षासह वसतिगृहात जागोजागी घाण, दुर्गंधी व कचराही साचलेला असतो.
या प्रबोधिनीत नियमित स्वच्छता होत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. यासंदर्भात प्राचार्यांकडे वारंवार तक्रारी करूनही परिस्थिती सुधारली नाही. प्राचार्यांनी समाधानकारक उत्तर देण्याऐवजी उलट खेळाडूंनाच दमदाटी केली. विद्यार्थ्यांना क्रीडा प्रबोधिनीमधून हाकलून देण्याची व प्रबोधिनी बंद करण्याची धमकीही देण्यात आली आहे. या प्रकारानंतर, सर्व खेळाडू जिल्हाधिकारी कार्यालयात गाठले. जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल कार्यालयात आल्यानंतर खेळाडूंनी त्यांची भेट घेऊन आणि आपली व्यथा सांगून सकस आहारासह आवश्यक सोयीसुविधांची मागणी केली आहे.