महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

बॉक्सर निकिता चंदने आशियाई ज्यूनियर बॉक्सिंग स्पर्धेत जिंकले सुवर्ण पदक - बॉक्सर निकिता चंद

आशियाई ज्यूनियर बॉक्सिंग चॅम्पियनशीपमध्ये भारताची महिला बॉक्सर निकिता चंद हिने सुवर्ण पदक जिंकले.

pithoragarh-boxer-nikita-of-won-gold-medal-in-dubai-asian-boxing-competition
बॉक्सर निकिता चंदने आशियाई ज्यूनियर बॉक्सिंग स्पर्धेत जिंकले सुवर्ण पदक

By

Published : Aug 30, 2021, 9:53 PM IST

पिथौरागड (उत्तराखंड) -आशियाई ज्यूनियर बॉक्सिंग चॅम्पियनशीपमध्ये भारताची महिला बॉक्सर निकिता चंद हिने सुवर्ण पदक जिंकले. तिने 60 किलो वजनी गटात रविवारी रात्री, दुबईत झालेल्या सामन्यात कजाकिस्तानच्या आसेम तानाटार हिचा पराभव केला.

निकिता चंद ही मूळची पिथौरागड येथी रहिवाशी आहे. तिचे वडिल एक शेतकरी आहेत. निकिताने बॉक्सिंगचे धडे प्रशिक्षक बिजेंद्र मल्ल यांच्याकडून घेतले. ती पिथौरागड येथील एका खासगी शाळेत शिक्षण घेत आहे. निकिताने सुवर्ण कामगिरीचे श्रेय आई वडिलांना दिले.

निकिता चंदने सुवर्ण पदक जिंकल्यानंतर तिच्या घरी शुभेच्छा देण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली. उत्तराखंडचे कॅबिनेट मंत्री बिशन सिंह चुफाल यांनी निकिता चंदचे अभिनंदन केलं. ते म्हणाले की, पिथौरागडच्या मुलीने आशियाई ज्यूनियर बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक जिंकत देश आणि राज्याचे नाव उज्वल केले आहे. निकिताला तिच्या उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा.

हेही वाचा -Tokyo Paralympics : राहुल गांधींनी केलं सुमित अंतिलच्या विश्वविक्रमाचे कौतुक

हेही वाचा -Tokyo Paralympics: सुमित अंतिलची 'सुवर्ण' कामगिरी, पंतप्रधान मोदींसह राहुल गांधींनी केलं अभिनंदन

ABOUT THE AUTHOR

...view details