हैदराबाद -यंदाच्या प्रो कबड्डी स्पर्धेत जयपूर पिंक पँथर्सच्या संघाने यू मुंबाचा धुव्वा उडवत विजयारंभ केला. या सामन्यात त्यांनी यू मुंबावर तब्बल 19 गुणांनी मात केली. कर्णधार दीपक हुडाच्या दमदार कामगिरीमुळे जयपूरला हा विजय मिळवता आला.
हैदराबादच्या गच्चीबावली इंडोर स्टेडियममध्ये हा सामना रंगला होता. सलामीच्या सामन्यात विजय मिळवलेल्या यू मुंबाला जयपूरविरुद्धच्या सामन्यात चांगले प्रदर्शन करता आले नाही. त्यांनी हा सामना 42-23 च्या फरकाने गमावला. पहिल्या सत्रात जयपूरच्या संघाने 22-9 ने आघाडी मिळवली होती. काही मिनिटांमध्ये यू मुंबाच्या संघाला सर्वबाद करत जयपूरने आघाडी घेतली.