हैदराबाद : प्रामाणिकपणे स्पर्धा करणे आणि आपला पराभव मोठ्या मनाने स्वीकारणे हे दोन महत्त्वाचे गुण खिलाडू वृत्तीत असतात. याउलट अनेक देशांमध्ये इतर खेळाडूपेक्षा चांगली कामगिरी करण्यासाठी ड्रग्जचा वापर केला जातो, जो अनैतिक आहे.
डोपिंगबद्दल तर आता सगळ्यांना माहीत आहे. या लोकप्रिय प्रकाराचा वापर हल्ली सर्रास होत आहे. दुर्दैवाने देशांतर्गत होणाऱ्या क्रीडा प्रकारातही याचा वापर होत आहे. या पार्श्वभूमीवर इंटरनॅशनल वेटलिफ्टिंग फेडरेशनने (IWF) भारतीय वेटलिफ्टर संजिता चानूवर डोपिंगचे आरोप केले होते. २०१९च्या एशियन चँपियनशिपमध्ये गोमती मरिमुथुने ८०० मीटर सुवर्णपदक जिंकले. वर्ल्ड अँटी डोपिंग एजन्सीने (WADA) तिच्यावर ४ वर्षाची डोपिंग बंदी घातली. दरम्यान, राष्ट्रीय अँटी-डोपिंग एजन्सीने (NADA) क्रीडापटू अमृतपाल सिंग (बास्केटबॉल), नीरज फोगट (बॉक्सिंग) आणि श्रावण कुमार (शूटिंग) यांच्यावर बंदी घालण्याची तयारी सुरू केली आहे.
याशिवाय कबड्डी, भालाफेक आणि वेटलिफ्टिंग करणारे काही प्रोफेशनल्स, क्रिकेटर पृथ्वी शहा आणि धावपटू संजीविनी जाधव यांनाही NADA ने ब्लॅकलिस्ट केले आहे. खेळामध्ये व्यावसायिकतेची कमतरता असल्याने भारत आता रशिया आणि तुर्कीच्या रांगेत उभा राहिला आहे.
समकालीन क्रीडा इतिहासात, रशियामध्ये नीतिमत्तेचा ऱ्हास झाला. वर्ल्ड अँटी डोपिंग असोसिएशनने (WADA) रशियाच्या २९८ क्रीडापटूंची चौकशी सुरू केली होती. रशियामध्ये डोपिंग हा व्यवस्थेचाच भाग झाला. खेळाडू, प्रशिक्षक, डॉक्टर आणि अधिकारी सर्वजण या प्रक्रियेत सामील आहेत. ‘वाडा’ने रशियावर पुढील ४ वर्षासाठी महत्त्वाच्या क्रीडा प्रकारात भाग घ्यायला बंदी घातली आहे.