दुबई - भारतीय पॅरा तिरंदाजांनी जागतिक रॅकिंग पॅरा तिरंदाजी स्पर्धेत दुसऱ्या दिवशी एक सुवर्ण आणि दोन रौप्य पदक पक्के केले. भारताचे तिरंदाज राकेश कुमार आणि श्याम सुंदर स्वामी या दोघांनी स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. तर ज्योती बालियान हिने महिला वर्गात अंतिम फेरी गाठली आहे.
उपांत्य फेरीच्या सामन्यात राकेशने तुर्कीच्या अयागन एर्दोगन याचा १४५-१४३ अशा फरकाने पराभव केला. तर स्वामीने स्लोवाकियाचा गतविजेता तिरंदाज मारसेल पावलिक याचा १४५-१४३ ने पराभव करत अंतिम फेरी गाठली.
महिला गटात ज्योतीने रुसच्या दजियोएवा अनास्तासिया हिचा अवघ्या एका गुणांने पराभव केला. तिने १३९-१३८ अशा फरकाने हा सामना जिंकला. अंतिम सामन्यात ज्योतीचा सामना रुसच्या स्टेपानिदा अर्ताखिनोवा हिच्याशी होणार आहे. ज्योतीने २०१९ मध्ये अशियाई चॅम्पियन स्पर्धेत श्माम सुंदरशी जोडी जमवत मित्र दुहेरीत रौप्य पदक जिंकले होते.
हेही वाचा -गोल्फपटू टायगर वूड्स यांच्या कारचा अपघात, रुग्णालयाने दिली 'ही' माहिती
हेही वाचा -कर्नाटक करणार दुसऱ्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्सचे आयोजन