महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

नीरज चोप्राविषयी पाकिस्तानी भालाफेकपटूने काय लिहलं की, ज्यामुळे त्याला ट्विट डिलिट कराव लागलं

नीरज चोप्रा याच्यासोबत अंतिम सामन्यात पाकिस्तानचा भालाफेकपटू अर्शद नदीम देखील होता. नदीम पाचव्या स्थानावर राहिला आणि त्याला पदक जिंकण्यात यश आलं नाही. पण अर्शद नदीम याने खेळभावना दाखवत सुवर्ण पदक विजेता नीरज चोप्रा याला शुभेच्छा दिल्या. यात त्याने केलेलं पहिलं ट्विट त्याला डिलिट करावं लागलं. यानंतर त्याने आणखी एक ट्विट केलं आहे.

pakistan-javelin-thrower-arshad-nadeem-praises-tokyo-olympics-gold-medallist-neeraj-chopra-but-later-delete-the-tweet-know-why
नीरज चोप्राविषयी पाकिस्तानी भालाफेकपटूने काय लिहलं की, ज्यामुळे त्याला ट्विट डिलिट कराव लागलं

By

Published : Aug 8, 2021, 9:37 AM IST

मुंबई - भारतीय भालाफेकपटू नीरज चोप्रा याने टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकत इतिहास रचला. भारताचे हे ऑलिम्पिक इतिहासामध्ये ट्रॅक अँड फिल्डमधील पहिल्या वैयक्तिक सुवर्ण पदक आहे. 2018 मध्ये अभिनव ब्रिंदा याने वैयक्तिक स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकलं होतं. यानंतर नीरज अशी कामगिरी करणारा दुसरा भारतीय खेळाडू ठरला. नीरज चोप्रा याने दुसऱ्या प्रयत्नात 87.58 मीटर लांब भाला फेकत पहिलं स्थान पटकावलं. दरम्यान, भारताने टोकियो ऑलिम्पिकमध्ये हे सातवं पदक ठरलं. यासह भारताचा एका ऑलिम्पिकमध्ये सर्वाधिक पदक जिंकण्याचा विक्रम बनला.

नीरज चोप्रा याच्यासोबत अंतिम सामन्यात पाकिस्तानचा भालाफेकपटू अर्शद नदीम देखील होता. नदीम पाचव्या स्थानावर राहिला आणि त्याला पदक जिंकण्यात यश आलं नाही. पण अर्शद नदीम याने खेळभावना दाखवत सुवर्ण पदक विजेता नीरज चोप्रा याला शुभेच्छा दिल्या. यात त्याने केलेलं पहिलं ट्विट त्याला डिलिट करावं लागलं. यानंतर त्याने आणखी एक ट्विट केलं आहे.

अर्शद नदीन याने नीरज चोप्रा माझा आदर्श असल्याचे सांगत शुभेच्छा दिल्या होत्या. तसेच त्याने यात पदक जिंकू न शकल्यामुळे पाकिस्तानच्या जनतेची माफी देखील मागितली होती. अर्शद त्याच्या ट्विटमध्ये म्हणाला, माझा आदर्श नीरज चोप्रा याला सुवर्ण पदक जिंकल्याबद्दल शुभेच्छा. पाकिस्तानची मी माफी मागतो की मी सुवर्ण पदक जिंकू शकलो नाही.

नीरज चोप्रा याला आपला आदर्श असल्याचे सांगण अर्शद नदीमला महागात पडलं. पाकिस्तानात त्याला ट्रोल करण्यात येत होतं. तेव्हा त्याने आपलं ट्विट डिलीट केलं. काही वेळाने त्याने पुन्हा ट्विट केलं. या तो म्हणतो, नीरज चोप्राला सुवर्ण पदक जिंकल्याबद्दल शुभेच्छा.

नीरज चोप्रा याने पहिल्या प्रयत्नात 87.03 मीटर लांब भाला फेकला. जर्मनीचा जुलियन वेबर याने कारकिर्दीतील सर्वश्रेष्ठ 85.30 मीटर लांब भाला फेकला. तर पाकिस्तानच्या अर्शद नदीम याने पहिल्या प्रयत्नात 82. 4 मीटर लांब भाला फेकला.

हेही वाचा -Tokyo Olympics: भारताचे राष्ट्रगीत ऐकताच नीरज चोप्रा झाला भावूक, व्हिडिओ होतोय व्हायरल

हेही वाचा -Tokyo Olympics Day 16: एका 'गोल्ड'सह भारताची पदक तालिकेत झेप.. आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी

ABOUT THE AUTHOR

...view details