ऑर्लिन्स: भारतीय बॅडमिंटनपटू मिथुन मंजुनाथने ( Shuttler Mithun Manjunath ) रविवारी ऑर्लिन्स मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत इंडोनेशियाच्या क्रिस्टियन एडिनाटावर सरळ गेममध्ये विजय मिळवत प्रथमच सुपर 100 ची अंतिम फेरी गाठली. प्रकाश पदुकोण बॅडमिंटन अकादमीच्या 23 वर्षीय मंजुनाथने शनिवारी रात्री 47 मिनिटे चाललेल्या सामन्यात एडिनाटाला 21-18, 21-14 असे पराभूत केले. जागतिक क्रमवारीत 79 व्या स्थानावर असलेल्या मंजुनाथची आता अंतिम फेरीत चौथ्या मानांकित स्थानिक खेळाडू टोमा ज्युनियर पोपोव्हशी लढत होईल. ज्याचे रँकिंग 32 आहे.
मंजुनाथने यावर्षी सय्यद मोदी इंटरनॅशनल सुपर 300 ( Syed Modi International Super 300 ) च्या उपांत्य फेरीत आणि ओडिशा सुपर 100 च्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला होता. इतर निकालांमध्ये, अश्विनी भट्ट आणि शिखा गौतम या महिला दुहेरीच्या जोडीने उपांत्य फेरीत जर्मनीच्या स्टाइन कुस्पर्ट आणि एम्मा मोझ्झिंस्की यांच्याशी कडवी झुंज दिली. परंतु 16-21, 21-18, 22-24 असा पराभव पत्करावा लागला.