महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

Tokyo Olympics साठी १० हजार प्रेक्षकांना स्टेडियममध्ये येण्यास परवानगी - टोकिओ ऑलिम्पक न्यूज

टोकियो ऑलिम्पिकच्या आयोजकांनी, स्पर्धा पाहण्यासाठी स्टेडियमच्या आसन संख्येच्या ५० टक्के किंवा १० हजार, यापैकी जो आकडा लहान असेल, तितक्या प्रेक्षकांना परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे.

organisers-says-up-to-10-000-fans-allowed-at-tokyo-olympics-events
Tokyo Olympics साठी १० हजार प्रेक्षकांना स्टेडियममध्ये येण्यास परवानगी

By

Published : Jun 21, 2021, 5:04 PM IST

टोकियो - टोकियो ऑलिम्पिकला सुरूवात होण्यासाठी जवळपास एक महिन्याचा कालावधी शिल्लक राहिला आहे. २३ जुलै ते ८ ऑगस्ट या दरम्यान ही स्पर्धा पार पडणार आहे. टोकियो ऑलिम्पिकच्या आयोजकांनी, स्पर्धा पाहण्यासाठी स्टेडियमच्या आसन संख्येच्या ५० टक्के किंवा १० हजार, यापैकी जो आकडा लहान असेल, तितक्या प्रेक्षकांना परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे.

टोकियो ऑलिम्पिक मागील वर्षी होणार होते. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, ही स्पर्धा एका वर्षाने पुढे ढकलण्यात आली. जपानमध्ये कोरोनाच्या चौथ्या लाटेमुळे रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने यंदाही टोकियो ऑलिम्पिकच्या आयोजनावर प्रश्नचिन्ह होते. मात्र, यंदा ही स्पर्धा ठरल्याप्रमाणेच होणार असल्याचे स्पष्ट झालं. टोकियो ऑलिम्पिक आयोजकांनी, स्पर्धा पाहण्यासाठी आसन संख्येच्या ५० टक्के किंवा १० हजार, यापैकी जो आकडा लहान असेल, तितक्या प्रेक्षकांना परवानगी देण्याचा निर्णय घेतला. असे असले तरी कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढल्यास या निर्णयात बदल केला जाईल, असेही टोकियोचे राज्यपाल युरिको कोईके यांनी स्पष्ट केलं आहे.

परदेशी नागरिकांवर जपानमध्ये बंदी घातल्याने त्यांना स्टेडियममध्ये प्रवेश नसणार आहे. तसेच पॅरालिम्पिकसाठी प्रेक्षकांना परवानगी देण्याबाबतचा निर्णय १६ जुलैपर्यंत पुढे ढकलण्यात आला आहे.

हेही वाचा -मिल्खा सिंह यांचा पत्नी निर्मलसह अंतिम प्रवास; पाहा प्रेमाचे भावनिक बंध जपणारा फोटो

हेही वाचा -कौतु्कास्पद..! तीन वर्षाच्या आर्याने सहा मिनिटात दोन रेकॉर्ड केले नावावर

ABOUT THE AUTHOR

...view details