चेन्नई - भारताला आठ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या ऑनलाईन फिडे बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेत दुसऱ्या सत्रामध्ये, टॉप डिव्हिजनच्या बी गटात ठेवण्यात आलं आहे. दरम्यान, भारत मागील वर्षी या स्पर्धेचा संयुक्त विजेता ठरला होता.
ग्रुप बी मध्ये भारत, फ्रान्स, बेलारूस, आणि अजरबैजान यांच्यासह इतर संघाचा समावेश आहे. इतरमध्ये शेनझेन चीन, मोल्दावा, स्लोवेनिया, मिस्त्र, स्वीडन आणि हंगेरी या संघाचा समावेश आहे. चार ग्रुपमधून प्रत्येकी दोन संघ प्ले ऑफ फेरीसाठी पात्र ठरतील.
शेनजेन चीन, मोल्दोवा, स्लोवेनिया आणि स्वीडन हे दुसऱ्या डिव्हिडजन (ग्रुप ए) मधून टॉप डिव्हिजनसाठी पात्र ठरले आहेत. एकूण 15 संघांनी दुसऱ्या डिव्हिजनमधून टॉप डिव्हिजनमध्ये पात्रता मिळवली आहे. टॉप डिव्हिडजनमध्ये रूस, अमेरिका, चीन, भारतसह 25 संघाचा समावेश आहे.