पुणे- विश्व कुस्ती चॅम्पियनशीप स्पर्धेत कांस्यपदक पटकवल्यानंतर आता माझे लक्ष्य ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्याचे आहे. यासाठी मी सराव सुरू केला असल्याचे कुस्तीपटू राहुल आवारेने सांगितले. त्याचे मंगळवारी रात्री पुण्यात आगमन झाले. त्यानंतर आज बुधवारी पुणे श्रमिक पत्रकार संघाच्यावतीने आयोजित वार्तालाप कार्यक्रमात तो बोलत होता.
महाराष्ट्रात भरपूर गुणवत्ता आहे. मात्र, मातीतील कुस्तीमुळे या गुणवत्तेला चालना मिळत नाही. कोल्हापूर कुस्तीचे माहेरघर असले, तरी अकादमी अथवा सोयी-सुविधांचा अभाव असल्याने कुस्तीपटू पुण्यात सरावासाठी येत आहेत. यामुळे कोल्हापूरमध्ये सर्व सोयी-सुविधा युक्त असे कुस्तीचे मोठे स्पोर्टस् कॉम्प्लेक्स उभे करायला हवे, असे मत त्याने व्यक्त केले.
हेही वाचा - विश्व कुस्ती चॅम्पियनशीप : मराठमोळ्या राहुल आवारेने जिंकले कांस्यपदक