जालंधर : ऑलिम्पिक हॉकीपटू वरिंदर सिंग यांचे मंगळवारी पंजाबमधील जालंधरमध्ये निधन झाले. 16 मे 1947 मध्ये जन्मलेले, ऑलिंपियन हे भारतीय फील्ड हॉकी खेळाडू होते. म्युनिक येथे 1972 च्या उन्हाळी ऑलिंपिकमध्ये त्यांच्या संघाने कांस्यपदक जिंकले. 1976 च्या उन्हाळी ऑलिम्पिकमध्येही त्यांनी भाग घेतला होता. ध्यानचंद पुरस्कार विजेते वरिंदर सिंग यांच्यावर आज अंत्यसंस्कार होणार आहेत.
ऑलिम्पिक हॉकीपटू वरिंदर सिंग यांचे निधन - Varinder Singh passes away
हॉकीपटू वरिंदर सिंग यांचे मंगळवारी पंजाबमधील जालंधरमध्ये निधन झाले. 16 मे 1947 मध्ये जन्मलेले, ऑलिंपियन हे भारतीय फील्ड हॉकी खेळाडू होते. म्युनिक येथे 1972 च्या उन्हाळी ऑलिंपिकमध्ये त्यांच्या संघाने कांस्यपदक जिंकले. वरिंदर सिंग यांच्यावर आज दुपारी 3.30 वाजता त्यांच्या मूळ गावी धन्नोवली, जीटी रोड, जालंधर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
ऑलिम्पिक हॉकीपटू वरिंदर सिंग यांचे निधन
दिग्गज हॉकीपटूच्या दुर्दैवी निधनाबद्दल, सुरजित हॉकी सोसायटीने शोक व्यक्त केला आणि म्हटले, "आम्हा सुरजित हॉकी सोसायटीचे सर्व सदस्यांना हे कधीही भरून न येणारे नुकसान सहन करण्याची शक्ती आणि बळ देव देवो आणि त्यांना चिरशांती देवो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो."
ऑलिंपियन वरिंदर सिंग यांच्यावर आज दुपारी 3.30 वाजता त्यांच्या मूळ गावी धन्नोवली, जीटी रोड, जालंधर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.