महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

'गोल्डन बॉय' नीरज चोप्राचा क्रमवारीत डंका, गाठलं थेट 'हे' स्थान

जागतिक क्रमवारीत नीरज चोप्राच्या आधी टॉप 1 वर जर्मनीचा भालाफेकपटू जोहानेस वेटर आहे. त्याच्या खात्यात 1392 गुण आहेत. तर दुसऱ्या स्थानावर नीरज चोप्राने मुसंडी मारली असून त्याचे 1315 गुण आहेत.

Olympic Gold medallist Neeraj Chopra rises to number 2 in world rankings
'गोल्डन बॉय' नीरज चोप्राचा क्रमवारीत डंका, गाठलं थेट 'हे' स्थान

By

Published : Aug 12, 2021, 3:56 PM IST

मुंबई - टोकियो ऑलिम्पिकमध्ये देशासाठी सुवर्ण पदक जिंकून देणारा भालाफेकपटू नीरज चोप्राची क्रमवारी सुधारली आहे. ताज्या क्रमवारीनुसार, नीरज 14 स्थानाच्या सुधारणेसह थेट दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. नीरजने ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीत 87.58 मीटर लांब भाला फेकत ट्रॅक अँड फिल्डमध्ये देशाला पहिलं पदक जिंकून दिलं. नीरज भारताकडून ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकणारा दुसरा खेळाडू आहे. सुवर्ण पदक जिंकून मायदेशी परतल्यानंतर नीरज चोप्राचे जंगी स्वागत करण्यात आले. क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी नीरजचा सन्मान केला.

क्रमवारीत नीरज चोप्राच्या आधी टॉप 1 वर जर्मनीचा भालाफेकपटू जोहानेस वेटर आहे. त्याच्या खात्यात 1392 गुण आहेत. तर दुसऱ्या स्थानावर नीरज चोप्राने मुसंडी मारली असून त्याचे 1315 गुण आहेत.

दरम्यान, भारतीय खेळाडूनी टोकियो ऑलिम्पिकमध्ये चांगली कामगिरी केली. या ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंनी 7 पदके जिंकली. यात एक सुवर्ण पदक, दोन रौप्य पदक आणि चार कास्य पदकाचा समावेश आहे. आतापर्यंत ऑलिम्पिकमध्ये भारताची ही सर्वश्रेष्ठ कामगिरी आहे. 2012 लंडन ऑलिम्पिकमध्ये भारताने 6 पदकं जिंकली होती.

नीरजचे फॉलोअर्स दणक्यात वाढले

टोकियो ऑलिम्पिकआधी 23 वर्षीय नीरज चोप्राचे इन्स्टाग्रामवर 143,000 फॉलोअर्स होते. पण टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकल्यानंतर नीरजच्या फॉलोअर्सची संख्या झपाट्याने वाढली. त्याचे 3.2 मिलियन फॉलोअर्स झाले आहेत. फॉलोअर्सची संख्या दिवसागणिक वाढतच आहे. नीरज जगात सर्वात जास्त फॉलोअर्स असलेला ट्रॅक अँड फिल्डमधील अॅथलिट ठरला आहे.

हेही वाचा -मास्टर ब्लास्टरशी भेटली मीराबाई चानू, ऑलिम्पिक पदक पाहून सचिन तेंडुलकरचे रिअॅक्शन, पाहा फोटो

हेही वाचा -INTERVIEW: कास्य पदकावर समाधानी नाही लवलिना बोर्गोहेन, म्हणाली पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण जिंकून स्वप्न पूर्ण करेन

ABOUT THE AUTHOR

...view details