नवी दिल्ली -भारताचा आघाडीचा कुस्तीपटू सुशील कुमारने आगामी विश्व चम्पियनशिप स्पर्धेसाठी भारतीय संघात स्थान मिळवले. ७४ किलो वजनीगटात, त्याने कुस्तीपटू जितेंदर कुमारला ४-२ ने हरवले. या सामन्यानंतर, जितेंदर कुमारचे प्रशिक्षक जयवीर यांनी सुशील कुमारवर गंभीर आरोप केले आहेत.
या दोन्ही कुस्तीपटूंनी हा सामना आक्रमक पद्धतीने खेळला होता. सामन्याच्या दुसऱ्या सत्रात जितेंदरच्या डोळ्याला दुखापत झाली होती. त्यानंतर, सुशील कुमारने या घटनेबद्दल माफी मागितली. त्यानंतर सुशीलच्या एका आक्रमक डावामुळे त्याला परत दुखापत झाली. या प्रकारांमुळे जयवीर यांनी सुशील कुमारवर आरोप केले आहेत.