अम्मान(जॉर्डन) - भारताचा पुरूष बॉक्सिंगपटू विकास कृष्णनने आशियाई ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत ६९ किलो वजनी गटात अंतिम फेरी गाठली आहे, तर विश्व अजिंक्यपद स्पर्धेतील रौप्यपदक विजेता अमित पांघलला या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पराभवाचा धक्का बसला. महिला गटात भारताची लवलिना बोरगोहेनचे आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आले. पांघल आणि लवलिना या दोघांना कांस्य पदकावर समाधान मानावे लागले.
पुरूष ६९ वजनी गटात विकासने कझाकिस्तानच्या अबलाखान जुसुपोव्हचा उपांत्य फेरीत ३-२ ने पराभव करत अंतिम फेरी गाठली.
पुरुषाच्या ५२ किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत चीनच्या हु जियानगुआन यानेपांघलचा पराभव केला. रिओ ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक विजेता जियानगुआनने अटीतटीच्या लढतीत ३-२ असा पराभव करत पांघलचे स्पर्धेतील आव्हान संपवले.