महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

पुरस्कार परत करणाऱ्या खेळाडूंच्या मागे काँग्रेसचा हात; कुस्तीपटू योगेश्वर दत्तचं मोठं वक्तव्य - राहुल गांधी

Yogeshwar Dutt allegations against Congress : हरियाणाची महिला कुस्तीपटू विनेश फोगटनं 'मेजर ध्यानचंद खेलरत्न' आणि 'अर्जुन पुरस्कार' परत केलाय. त्याचबरोबर कुस्तीपटू साक्षी मलिकनंही कुस्तीतून निवृत्ती जाहीर केलीय. अशा स्थितीत भारतीय कुस्तीगीर संघटना आणि कुस्तीगीर यांच्यातील वादानं आता राजकीय रंग घेतलाय. कुस्तीपटू योगेश्वर दत्तनं या घटना राजकीय हेतूनं प्रेरित असल्याचं म्हटलंय. याशिवाय काँग्रेसवरही याबाबत गंभीर आरोप करण्यात आले आहेत.

Yogeshwar Dutt allegations against Congress
Yogeshwar Dutt allegations against Congress

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 1, 2024, 12:06 PM IST

रोहतक Yogeshwar Dutt Allegations Against Congress : ऑलिम्पियन योगेश्वर दत्तनं कुस्तीपटूंचं वर्तन राजकीयदृष्ट्या प्रेरित असल्याचं म्हटलंय. हा पुरस्कार केवळ खेळाडूचाच नाही, तर संपूर्ण देशाचा सन्मान आहे. यात खेळाडू आणि त्यांच्या कुटुंबाचं योगदान असतं तितकंच योगदान सरकारचंही असंत. हे संपूर्ण प्रकरण खेदजनक असल्याचं त्यानं म्हटलंय. हरियाणाची महिला कुस्तीपटू विनेश फोगटनं पुरस्कार परत केल्यानंतर योगेश्वर दत्तनं कुस्ती वादावर दुःख व्यक्त केलंय.

कुस्तीपटूंच्या वादामागे काँग्रेस - योगेश्वर दत्त : कुस्तीपटूंच्या वादामागे काँग्रेसचा हात असल्याचं योगेश्वर दत्तनं म्हटलंय. या घटनांचं स्क्रिप्ट आधीच तयार झालंय. या लोकांना लोकसभा निवडणुकीपर्यंत हा मुद्दा लावून धरायचा आहे. कुस्तीपटू योगेश्वर दत्तनं काँग्रेसवर गंभीर आरोप केले असून यामागं राहुल गांधी, दीपेंद्र हुड्डा, भूपेंद्र हुड्डा आणि प्रियांका गांधी यांचा हात असल्याचं त्यानं म्हटलंय.

संपूर्ण प्रकरणाचं स्क्रिप्ट आधीच लिहिलेलं :पुरस्कार परत करणे हा कुस्तीपटूंचा वैयक्तिक निर्णय असू शकतो. मात्र, या वादामुळं कुस्तीची दुर्दशा होत असल्याचं त्यानं सांगितलं. कुस्ती खेळातील वर्षभरापासून सुरु असलेल्या वादामुळं ज्युनियर व सबज्युनियर खेळाडूंच्या खेळावर वाईट परिणाम झालाय. त्यांचं दररोज नुकसान होतंय. त्या खेळाडूंना बोलताही येत नाही, अशी परिस्थिती निर्माण झालीय. कारण त्यांचं ऐकणारं कोणीच नाही. कुस्तीचं हे युग पाहून खूप वाईट वाटतं असल्याचं त्यानं म्हटलंय. हे प्रकरण लवकरात लवकर सोडवावं आणि कुस्ती खेळ उद्ध्वस्त होण्यापासून वाचवावं अशी विनंती योगेश्वर दत्तनं भारत सरकार आणि क्रीडा मंत्रालयाला केलीय.

कुस्तीत राजकारण : कुस्तीपटू योगेश्वर दत्त म्हणाला की, खेळाडूंचा वादग्रस्त मुद्दा कोर्टात प्रलंबित आहे. त्यावर येत्या काळात निर्णय घेतला जाईल. जोपर्यंत फेडरेशनचा संबंध आहे, त्यांच्या निवडणुका निष्पक्ष होत्या. त्यांची फेडरेशनमध्ये सचिव आणि कनिष्ठ उपाध्यक्षपदी निवड झालीय. या खेळाडूंना महासंघात महिला अधिकारी हव्या होत्या, तर त्यांनी सचिवपदासाठी आणि कनिष्ठ उपाध्यक्षपदासाठीही महिलांची नावं द्यायला हवी होती. पण सध्या ज्या प्रकारचा वाद सुरु आहे, त्याला पूर्णपणे राजकीय रंग चढल्याचं योगेश्वर दत्त म्हणाला.

हेही वाचा :

  1. विनेश फोगटनं खेलरत्न, अर्जुन पुरस्कार कर्तव्यपथावर ठेवला; बजरंग पुनिया, विजेंदर सिंगची समर्थनार्थ पोस्ट
  2. 'आता पुरस्कारांची किळस येतेय', बजरंग पुनिया पाठोपाठ विनेश फोगटनंही केली पुरस्कार परतीची घोषणा

ABOUT THE AUTHOR

...view details