नवी दिल्ली - छत्रसाल स्टेडिअममध्ये झालेल्या एका खूनाप्रकरणी दिल्ली पोलीस ऑलिम्पिक पदक विजेता कुस्तीपटू सुशील कुमारचा शोध घेत आहेत. पोलिसांनी बुधवारी सुशीलकुमारच्या घरी छापा टाकला होता मात्र, तो त्याठिकाणी नव्हता. पोलिसांना मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार सुशीलकुमार आणि त्याच्या मित्रांनी मिळून खून केल्याचे समोर येत आहे. या प्रकरणी पोलिसांनी प्रिन्स दलाल नावाच्या व्यक्तीला अटक केली असून घटनास्थळावरून एक डबल बॅरल गन देखील जप्त केली आहे.
मंगळवारी रात्री उशिरा मॉडल टाउनमध्ये असलेल्या छत्रसाल स्टेडिअममध्ये दोन कुस्तीपटूंच्या दोन गटांमध्ये वाद झाला होता. या वादामध्ये सागर, सोनू महाल आणि अमित कुमार हे तिघे गंभीर जखमी झाले होते. यातील सागरचा उपचारांदरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला. मॉडल टाउनमध्ये सुशीलकुमारचा एक फ्लॅट आहे. तो त्याने सागरला राहण्यासाठी दिला होता. काही दिवसांपूर्वी त्याने सागरला घर खाली करण्यास सांगितले होते. यावरूनच दोघांमध्ये वाद सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.
सुशीलची भूमिका संशयास्पद -