नवी दिल्ली -भारताचा स्टार बॉक्सिंगपटू सुमित सांगवानवर राष्ट्रीय उत्तेजक प्रतिबंधक संस्थेकडून (नाडा) एक वर्षांसाठी बंदी घालण्यात आली आहे. डोपिंग प्रकरणी दोषी आढळल्यामुळे सांगवानवर ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणामुळे आगामी टोकियो ऑलिम्पिकपूर्वी भारताला मोठा धक्का बसला आहे.
हेही वाचा -टीम इंडियाचा आफ्रिकेला धक्का, ९ विकेट्सने मिळवला विजय
सुमित सांगवानने आशियाई स्पर्धेत रौप्यपदक पटकावले होते. २०१२च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये सांगवान ९१ किलो वजनी गटात सहभागी झाला होता. शिवाय, त्याची आगामी ऑलिम्पिक पात्रता निवड चाचणी स्पर्धेसाठीसुद्धा त्याची निवड झाली होती.
स्पर्धा सुरू नसताना सांगवानची उत्तेजक चाचणी घेण्यात आली. तेव्हा त्याच्या लघवीच्या नमुन्यात 'अॅसेटॅझोलामाइड' या उत्तेजकांचे अंश सापडले आहेत. या प्रकरणी त्याच्यावर एका वर्षाची बंदी घालण्यात आली असून टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत तो खेळू शकणार नाही.