महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

Odisha open: चौदा वर्षाच्या वयात इतिहास रचणारी उन्नती हुड्डा कोण आहे? घ्या जाणून - Sachin Dias of Sri Lanka

हरियाणातील रोहतकची उन्नती हुड्डा (Rohtak's Unnati Hooda) भारताच्या बॅडमिंटनमध्ये खळबळ उडवून दिली आहे. ओडिशा येथे रविवारी झालेल्या 2022 बॅडमिंटन स्पर्धेत तिने स्मित तोष्णीवालचा पराभव केला.

UNNATI HOODA
UNNATI HOODA

By

Published : Jan 31, 2022, 4:05 PM IST

कटक: उन्नती हुड्डा आणि किरण जॉर्ज यांनी रविवारी ओडिसा ओपन सुपर 100 बॅडमिंटन स्पर्धेत (Odisha Open Super 100 Badminton Tournament), अनुक्रमे महिला आणि पुरुष एकेरी किताबावर आपले नाव कोरले आहे. महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात जाइंट किलर उन्नतीने स्मित तोशनीवालला केवळ 35 मिनिटे चाललेल्या सामन्यात पराभूत केले. तिने 21-18, 21-11 अशा फरकाने पराभव केला. त्याचबरोबर किरणने पुरुष गटात 58 मिनिटे चाललेल्या सामन्यात प्रियाशु राजावतला 21-15, 14-21 आणि 21-18 अशी मात दिली.

दरम्यान उन्नती ही वरिष्ठ राष्ट्रीय दौऱ्यात सलग दुसरी फायनल (Senior National Tour) खेळत होती. सुरुवातीला तिला थोडा त्रास झाला. त्यामुळे सलामीच्या गेममध्ये तोष्णीवालने मोठी आघाडी मिळवली (Toshniwal took a big lead). पण एकदा 14 वर्षांची उन्नती फॉर्ममध्ये आल्यावर तिने प्रतिस्पर्ध्याला झोडपायला सुरुवात केली आणि हळूहळू विजेतेपदाच्या सामन्यात मजबूत पकड मिळवली. तिने हाफ स्मॅशचाही प्रभावी वापर करत पहिल्या गेममध्ये 18-17 अशी आघाडी घेतली. दुसऱ्या गेममध्ये उन्नती ही प्रमुख खेळाडू होती कारण तिने 17-4 अशी आघाडी घेत प्रतिस्पर्ध्याला सरळ सेटमध्ये पराभूत केले.

तसेच दुसऱ्या बाजूला, किरणने राजावातला हरवण्यासाठी मोठा संघर्ष (Kiran struggles to defeat Rajavat) केला. कारण दोघांमध्ये एक कडवी झुंज पाहायला मिळाली. किरणने पहिल्या गेमध्ये 9-5 अशी आघाडी घेतली होती. परंतु राजावतने 12-12 असा स्कोर करत बरोबरी करण्यासाठी संघर्ष केला. मात्र युवा खेळाडू गती राखण्यात अपयशी ठरला आणि अंतिम चॅम्पियन पुढील 12 पैकी नऊ गुण जिंकून खेळ त्यांच्या पक्षात नेला.

दुसऱ्या गेमच्या सुरुवातीला राजावतलाही कैच अप खेळायचे होते, पण त्याने सरळ आठ गुणांसह ६-८अशी मोठी आघाडी घेतली आणि मागे वळून पाहिले नाही. राजावतने आपल्या बाजूने ठामपणे उभे केल्यामुळे, 19 वर्षीय खेळाडूने तिसऱ्या आणि अंतिम गेमच्या सुरुवातीला आत्मविश्वास आणि जोमाने पुढे जाऊन किरण परतण्यापूर्वी 10-4 अशी आघाडी घेतली. किरणने आक्रमक खेळ दाखवत एकेरी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली (Kiran won the singles Champions Trophy.).

दुहेरी प्रकारात त्रिसा जॉलीला दुहेरीचे जेतेपद पटकावता आले नाही. मात्र तिने महिला दुहेरीचे विजेतेपद पटकावले. त्याचवेळी मिश्र दुहेरीत त्याला विरोधी संघाकडून पराभवाला सामोरे जावे लागले. सय्यद मोदी इंटरनॅशनल फायनलिस्ट (Syed Modi International Finalist) जॉली आणि गायत्री गोपीचंद यांनी देशबांधव श्रुती मिश्राचा 21-12, 21-10 असा पराभव केला. तत्पूर्वी, जॉली आणि एमआर अर्जुन यांना मिश्र दुहेरीच्या अंतिम फेरीत श्रीलंकेच्या सचिन डायस (Sachin Dias of Sri Lanka) आणि थिलिनी हेंडाहेवा यांच्याकडून 16-21, 20-22 असा पराभव पत्करावा लागला होता.

या वयात सुरु केला सराव-

उन्नती हुड्डा ही रोहतकच्या भारत कॉलनीत राहणारी आहे. तिने रोहतक येथील सर छोटूराम स्टेडियम (Sir Chhoturam Stadium) मध्ये बॅडमिंटनचा सराव केला आहे. ती सात वर्षाची असल्यापासून बॅडमिंटनची कौशल्य शिकण्यासाठी मैदानात उतरली होती.

उन्नती हुड्डाच्या प्रशिक्षकाचे नाव प्रवेश आहे. उन्नती रोहतकमध्येच नववीच्या वर्गात शिकते आणि तिची आई डॉ. कविता या शिक्षिका आहेत. याआधी, उन्नतीने बंगळुरू येथे झालेल्या इन्फोसिस फाऊंडेशन इंडिया इंटरनॅशनल चॅलेंज स्पर्धेत चमकदार कामगिरी केली होती. तिथे तिने रौप्य पदक जिंकले, तर जगभरातील 355 महिला खेळाडूंनी त्या स्पर्धेत भाग घेतला होता.

ABOUT THE AUTHOR

...view details