महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

Italy Open Final : जोकोविच ठरला इटली ओपनचा चॅम्पियन, इगाने मोडला सेरेनाचा विक्रम - टेनिसपटू नोव्हाक जोकोविच

ऑस्ट्रेलियन ओपनदरम्यान लसीकरणाच्या वादामुळे टेनिसपटू नोव्हाक जोकोविच ( Tennis player Novak Djokovic ) मोसमाच्या सुरुवातीला बऱ्याच वेळा मैदानाबाहेर होता. मात्र या स्पर्धेत आपले वर्चस्व प्रस्थापित केले. त्याने स्टेफानोस सित्सिपासचा सरळ सेटमध्ये पराभव केला. त्याचबरोबर महिला गटात इगा स्विटेक चॅम्पियन ठरली.

novak & iga
novak & iga

By

Published : May 16, 2022, 5:37 PM IST

रोम: दिग्गज टेनिसपटू नोव्हाक जोकोविचने ( Veteran tennis player Novak Djokovic ) रविवारी इटली ओपनच्या अंतिम फेरीत स्टेफानोस सित्सिपासचा 6-0, 7-6 असा पराभव करून सहाव्यांदा विजेतेपद पटकावले. यासह सर्बियाच्या या स्टार खेळाडूने फ्रेंच ओपनपूर्वी जबरदस्त फॉर्ममध्ये असल्याचा दाखला दिला. त्याचवेळी, जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या इगा स्विटेकने ( Iga Swiatek ) रविवारी अंतिम फेरीत सातव्या क्रमांकाच्या ओन्स जबूरचा 6-2, 6-2 असा पराभव करून तिचे इटालियन ओपनचे विजेतेपद कायम राखले आणि सलग पाचवे डब्ल्यूटीएटूर विजेतेपद पटकावले.

जोकोविचने यापूर्वी उपांत्य फेरीत कॅस्पर रुडचा सरळ सेटमध्ये पराभव करून इटली ओपन टेनिस स्पर्धेच्या ( Italy Open tennis tournament ) अंतिम फेरीत धडक मारली होती. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या या खेळाडूने रुडेवर 6-4, 6-3 असा विजय मिळवून कारकिर्दीतील 1000 वा विजय नोंदवला ( 1000th victory recorded ). जिमी कॉनर्स (1,274 विजय), रॉजर फेडरर (1,251), इव्हान लेंडल (1,068) आणि राफेल नदाल (1,051) नंतर ही कामगिरी करणारा तो केवळ पाचवा पुरुष खेळाडू आहे.

इगा स्विटेकने महिलांच्या अंतिम फेरीत ओन्स जबूरचा पराभव करून सेरेना विल्यम्सचा सलग 27 विजयांचा विक्रम मोडला ( Iga Swiatek broke Serena Williams record ). सेरेनाने 2014 आणि 2015 मध्ये ही कामगिरी केली होती. ओन्स जेबरनेही सलग 11 विजयांसह अंतिम फेरी गाठली. पण अव्वल मानांकित खेळाडू स्विटेकसमोर तिचे एक चालले नाही. या 20 वर्षीय तरुणीने या हंगामात खेळलेले प्रत्येक डब्ल्यूटीए 1000 ( WTA 1000 ) जिंकले आहेत, दोहा, इंडियन वेल्स, मियामी आणि आता रोम येथे जिंकले आहेत. ती सध्या शेवटच्या नऊपैकी पाच डब्ल्यूटीए 1000 विजेतेपद जिंकण्यात यशस्वी राहिली आहे.

स्विटेकने गेल्या वर्षी रोममध्ये आपल्या कारकिर्दीतील पहिले डब्ल्यूटीए 1000 विजेतेपद ( First WTA 1000 Championship ) जिंकले होते. ख्रिस एव्हर्ट आणि गॅब्रिएला सबातिनी यांच्या मागे, रोममध्ये दोन विजेतेपदे जिंकणारी ती नववी खेळाडू आणि रोममध्ये दोन खिताब जिंकणारी तिसरी सर्वात तरुण खेळाडू आहे. दोहा, इंडियन वेल्स, मियामी, स्टटगार्ट आणि रोम येथे विजेतेपद पटकावल्यानंतर, 2000 च्या दशकात सलग पाच किंवा अधिक स्पर्धा जिंकणारा स्विटेक ही चौथी खेळाडू आहे.

हेही वाचा -EXCLUSIVE: 'मला संघाचा अभिमान आहे' - थॉमस चषकमधील ऐतिहासिक कामगिरीनंतर गोपीचंद

ABOUT THE AUTHOR

...view details