ट्युरिन : नोव्हाक जोकोविचने रविवारी तिसऱ्या मानांकित कॅस्पर रुडचा पराभव करीत रॉजर फेडररच्या विक्रमाची बरोबरी करीत सहाव्यांदा एटीपी फायनल्स टेनिस स्पर्धेचे विजेतेपद ( Novak Djokovic Defeated Casper Ruud in ATP Finals ) पटकावले. सर्बियाच्या जोकोविचने रुडचा ७-५, ६-३ असा पराभव करून २०१५ नंतर प्रथमच ही ( Novak Djokovic Beat Casper Ruud ) स्पर्धा जिंकली आणि फेडररच्या सहा विजेतेपदांची ( Novak Djokovic Defeated Third Seed Casper Ruud ) बरोबरी ( Novak Djokovic ATP Finals Tennis Tournament Title for Sixth Time ) केली.
पस्तीस वर्षीय जोकोविचला गेल्या दोन वेळा या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचताना पराभवाला सामोरे जावे लागले होते. जेतेपद पटकावल्यानंतर जोकोविच म्हणाला, सात वर्षे हा मोठा काळ आहे. शिवाय मी सात वर्षे वाट पाहिल्याने हा विजय आणखी गोड आणि मोठा बनतो. जोकोविच या वर्षअखेरीची स्पर्धा जिंकणारा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला आहे. त्याला टेनिस इतिहासातील सर्वात मोठी बक्षीस रक्कमही मिळाली. एटीपी फायनल्स जिंकण्यासाठी त्याला 47 लाख डाॅलर (सुमारे 38.78 कोटी रुपये) मिळाले.