दुबई : कोरोना प्रतिबंधक लस न घेतल्याने ऑस्ट्रेलियातून हकालपट्टी करण्यात आलेला जगातील नंबर वन टेनिसपटू नोवाक जोकोविच (Tennis Star Novak Djokovic) सोमवारी सकाळी दुबईमार्गे सर्बियाला रवाना झाला (Novak Djokovic leaves for Serbia via Dubai) आहे. अमीरातच्या विमानाने साडे तेरा तासांच्या उड्डाणानंतर तो मेलबर्नहून येथे पोहोचला. यानंतर तो सर्बियाची राजधानी बेलग्रेडला विमानाने जाताना दिसला.
दुबईमध्ये प्रवाशांसाठी लसीकरण अनिवार्य नाही (Vaccination not mandatory for travelers Dubai), परंतु फ्लाइटमध्ये बसण्यापूर्वी त्यांनी निगेटिव्ह RT-PCR रिपोर्ट दाखवणे आवश्यक आहे. 9 वेळा ऑस्ट्रेलियन ओपन आणि 20 ग्रँड स्लॅम विजेत्या जोकोविचचा व्हिसा ऑस्ट्रेलियामध्ये दोनदा रद्द (Djokovic's visa revoked twice in Australia) करण्यात आला आहे. कारण त्याने कठोर कोरोना लसीकरण नियमांमध्ये वैद्यकीय सवलतीसाठी आवश्यक असलेले निकष पूर्ण केले नाहीत.