दोहा : 22 व्या फिफा विश्वचषकाचा अंतिम सामना (FIFA world cup final match) रविवारी खेळवला जाणार आहे. या वेळी अनेक सेलिब्रिटी प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहेत. अंतिम सामन्यापूर्वी लुसेल स्टेडियममध्ये साउंडट्रॅक स्टार डेव्हिडो आणि आयशा, ओझुना आणि गिम्स, नोरा फतेही, बाल्किस, रहमा रियाद आणि मनाल लाईव्ह परफॉरमन्स देणार आहेत. (Nora Fatehi performance in FIFA world cup).
FIFA World Cup 2022 : विश्वचषकाच्या समारोप सोहळ्यात नोरा फतेहीचा लाईव्ह परफॉरमन्स
रविवारी रात्री 8.30 वाजता लुसेल स्टेडियमवर फ्रान्स आणि अर्जेंटिना यांच्यात अंतिम सामना (France vs Argentina final match) होणार आहे. यापूर्वी रंगणाऱ्या सोहळ्यात प्रसिद्ध बॉलिवुड अभिनेत्री नोरा फतेही (Nora Fatehi) लाईव्ह परफॉरमन्स देणार आहे. (Nora Fatehi performance in FIFA world cup).
फ्रान्स सलग दुसऱ्यांदा विजेता बनू शकतो : स्पर्धेमध्ये आता केवळ दोन सामने बाकी आहेत. तिसऱ्या स्थानासाठीचा सामना आज रात्री 8.30 वाजता क्रोएशिया आणि मोरोक्को (क्रोएशिया विरुद्ध मोरोक्को) यांच्यात होणार आहे. तर रविवारी रात्री 8.30 वाजता लुसेल स्टेडियमवर फ्रान्स आणि अर्जेंटिना यांच्यात अंतिम सामना होईल. गतविजेता फ्रान्स चौथ्यांदा विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. अंतिम सामन्यात अर्जेंटिनाचा पराभव करून फ्रान्स सलग दुसऱ्यांदा विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न पाहत आहे. दोन्ही संघांनी या आधी दोन वेळा विश्वचषक जिंकला आहे. 2018 च्या विश्वचषकाच्या फायनलमध्ये फ्रान्सने क्रोएशियाचा पराभव करून विजेतेपद पटकावले होते.
हेड टू हेड रेकॉर्ड :फुटबॉलच्या मैदानावर आतापर्यंत अर्जेंटिना आणि फ्रान्स 12 वेळा आपसांत भिडले आहेत. ज्यामध्ये अर्जेंटिनाने 6 सामने जिंकले आहेत तर फ्रान्सने केवळ तीन सामने जिंकले असून तीन सामने अनिर्णित राहिले आहेत. दोघांमध्ये पहिला सामना 1930 च्या विश्वचषकात झाला होता. अर्जेंटिनाने हा सामना 1-0 ने जिंकला होता.