महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

Boxer Nikhat Zareen : मी तांत्रिकदृष्ट्या सक्षम बॉक्सर झाले आहे - निखत जरीन - भारतीय बॉक्सर

आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी पात्र ठरलेली महिला बॉक्सर निखत जरीनने ( Women's boxer Nikhat Jareen ) गेल्या काही वर्षांतील कामगिरीचे विश्लेषण करून ती तांत्रिकदृष्ट्या सक्षम बॉक्सर बनल्याचे म्हटले आहे.

Nikhat Zareen
Nikhat Zareen

By

Published : Apr 21, 2022, 9:17 PM IST

नवी दिल्ली:टार्गेट ऑलिम्पिक पोडियम स्कीम (TOPS) च्या डेव्हलपमेंट टीमचा एक भाग असलेली निखत जरीन 6 ते 21 मे दरम्यान तुर्कीमध्ये होणाऱ्या महिला जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये तिच्या चांगल्या कामगिरीबद्दल उत्साहित आहे. टोकियो ऑलिम्पिक 2020 कांस्यपदक विजेती लोव्हलिना बोरगोहेन ( Bronze medalist Lovelina Borgohen ) आणि निखत यांच्यासह एकूण 12 भारतीय बॉक्सर या प्रतिष्ठित स्पर्धेत भाग घेतील, ज्यामध्ये या वर्षीच्या राष्ट्रकुल खेळ आणि आशियाई खेळांपूर्वी त्यांची परीक्षा होईल.

भारतीय क्रीडा प्राधिकरणाने (SAI) जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रात, निखत ( Boxer Nikhat Jareen ) म्हणाली, मी अत्यंत रोमांचित आणि आत्मविश्वासी (जागतिक चॅम्पियनशिपमध्ये भाग घेण्याबद्दल) आहे. मी गेल्या काही वर्षांत चांगली कामगिरी केली आहे आणि पुढेही करत राहण्याची आशा आहे. यासाठी मी चांगली तयारी केली आहे. ती म्हणाली, मी माझ्या कामगिरीचे विश्लेषण केले आहे आणि ज्या गोष्टी कमी होत्या त्यावर काम केले आहे. वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये मी माझे सर्वोत्तम प्रयत्न करेन. मी माझ्या खेळात शारीरिक आणि मानसिक सुधारणा केली आहे. मी आता तांत्रिकदृष्ट्या अधिक सक्षम बॉक्सर आहे.

12 बॉक्सर्स व्यतिरिक्त, भारतीय पथकामध्ये सपोर्ट स्टाफच्या 11 सदस्यांचा समावेश आहे. हे सर्वजण 20 एप्रिल रोजी तुर्कीला रवाना झाले आहेत, जिथे स्पर्धेपूर्वी 5 मे पर्यंत प्रशिक्षण शिबिर चालेल. निखत व्यतिरिक्त, नीतू घनघास, अनामिका, शिक्षा, जस्मिन, मनीषा, परवीन हुडा ( Parveen Hooda ), अंकुशिता बोरो, लोव्हलिना, स्वीटी, पूजा राणी आणि नंदिनी तुर्कीतील महिला जागतिक बॉक्सिंगमध्ये ( Women's World Boxing in Turkey ) भारताचे प्रतिनिधित्व करतील. क्रीडा मंत्रालयाने संघाच्या प्रशिक्षण शिबिरासाठी आणि स्पर्धेतील सहभागासाठी 92 लाख 12 हजार रुपये मंजूर केले आहेत.

निखतला यंदाच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत ( Asian Games ) महिलांच्या 51 किलो गटात आव्हान पेलावे लागणार आहे. निखत व्यतिरिक्त, मनीषा मोन (57 किलो), जस्मिन (60 किलो), लोव्हलिना (69 किलो) आणि स्वीटी बुरा (75 किलो) यांनी 10 ते 25 सप्टेंबर दरम्यान चीनमधील हांगझोऊ येथे होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी महिला संघात स्थान मिळवले आहे.

हेही वाचा -Ipl 2022 Mi Vs Csk : नाणेफेक जिंकून सीएसकेचा प्रथम गोलंदाजीचा निर्णय, मुंबई संघात दोन नवीन चेहऱ्यांना संधी

ABOUT THE AUTHOR

...view details