महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

नेत्रा कुमानन बनली ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणारी पहिली भारतीय नौकायनपटू - nethra kumanan qualify for tokyo olympics

नेत्रा कुमानन ही ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणारी भारताची पहिली महिला नौकायनपटू बनली आहे.

nethra kumanan first indian woman sailor to qualify for olympics first ever direct quota for country
नेत्रा कुमानन बनली ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणारी पहिली भारतीय नौकायनपटू

By

Published : Apr 8, 2021, 3:37 PM IST

मुंबई - नेत्रा कुमानन ही ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणारी भारताची पहिली महिला नौकायनपटू बनली आहे. ती ऑलिम्पिकसाठी सरळ पात्र ठरणारी भारताची पहिला नाविक ठरली. नेत्रा हिने ओमानमध्ये झालेल्या आशियाई क्लालिफायरच्या लेजर रेडियल स्पर्धेत अव्वलस्थान पटकावत टोकियो ऑलिम्पिकचे तिकीट पक्के केले. तिने भारताच्याच रम्या सरवनन हिच्यावर २१ अंकांची बढत घेऊन ही कामगिरी केली. आज (गुरुवार) या स्पर्धेतील अंतिम फेरी होणार असली तरी नेत्राची ऑलिम्पिकचे तिकीट पक्के झाले आहे.

चेन्नईच्या नेत्राने जानेवारी २०२० मध्ये सेलिंग वर्ल्ड कप स्पर्धेत कांस्य पदक जिंकले आहे. या कामगिरीसह ती नौकायनमध्ये पदक जिंकणारी भारताची पहिली महिला ठरली होती. नेत्राचे मुसानाह ओपन चँपियनशिपमध्ये १९ अंक आहेत तर आशियाई आणि आफ्रिकन ऑलिम्पिक क्वालिफायमध्ये ३९ अंक आहेत. लेझर रेडियल ही सिंगल हँडेड बोट असून त्यात एकच नाविक असतो.

आशियाई नौकानयन महासंघाचे अध्यक्ष मलव श्रॉफ म्हणाले की, गुरुवारच्या अंतिम स्पर्धेपूर्वीच नेत्रा ऑलिम्पिकसाठी पात्र ठरली आहे. दरम्यान, श्रॉफ यांनी स्वतः २००४ च्या अथेन्स ऑलिम्पिक नौकायन स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. ऑलिम्पिकसाठी नौकानयनमध्ये पात्र ठरणारी नेत्रा देशाची पहिली महिला ठरली आहे. तर याआधी ९ पुरूष खेळाडू ऑलिम्पिकसाठी पात्र ठरले होते.

हेही वाचा -EXCLUSIVE : 'मी संपूर्ण तयारीनिशी ऑलिम्पिकला जाऊ इच्छिते', बॉक्सिंगपटू पूजा राणीशी खास बातचित

हेही वाचा -टोकियो ऑलिम्पिकसाठी नेमबाजी संघात कोल्हापुरातील चौघांचा समावेश

ABOUT THE AUTHOR

...view details