नवी दिल्ली:भारताचा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्राने फिनलंडमधील पावो नूरमी गेम्समध्ये 89.30 मीटर भाला फेकून नवा राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित ( Neeraj Chopra new record in Finland ) केला. मात्र, 89.30 मीटरची सर्वोत्तम फेक करूनही नीरजला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. त्याने 88.07 मीटरचा आपला मागील राष्ट्रीय विक्रम मोडीत काढला, जो त्याने गेल्या वर्षी मार्चमध्ये पटियाला येथे प्रस्थापित केला होता.
7 ऑगस्ट 2021 रोजी टोकियो ऑलिम्पिकमध्ये 87.58m च्या ऐतिहासिक सुवर्णपदक-विजेत्या थ्रोनंतर चोप्राची ऑलिम्पिक खेळानंतरची ही पहिली आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहे. पावो नुर्मी गेम्समध्ये त्याचा राष्ट्रीय विक्रम मोडूनही तो स्पर्धेतील आपल्या आवडत्या ऑलिव्हर हेलँडरच्या ( Javelin thrower Oliver Helander ) मागे राहिला. त्यामुळे नीरजला दुसरा क्रमांक मिळाला. ऑलिव्हर हेलँडरने 89.93 मी वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी केली. दरम्यान, ग्रेनेडाच्या जगज्जेत्या अँडरसन पीटर्सने 86.60 मीटर भाला फेकून तिसरे स्थान पटकावले.