नवी दिल्ली - भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राला तुर्कस्तानहून माघारीचे बोलावणे आले आहे. कोरोना विषाणूचा धोका लक्षात घेता भारतीय अॅथलेटिक्स महासंघाने (एएफआय) नीरज चोप्रा आणि शिवपाल सिंह यांना अनुक्रमे तुर्की आणि दक्षिण आफ्रिकेहून भारतात परतण्यास सांगितले आहे.
हेही वाचा -कोरोना व्हायरसमुळे फ्रेंच ओपन स्पर्धाही पुढे ढकलली
एएफआयचे अध्यक्ष आदिल सुमारीवाला यांनी मंगळवारी याबाबत माहिती दिली. नीरज आणि शिवपाल सराव शिबिरांमध्ये सहभागी होणार होते. नीरज आणि रोहित यादव हे भारताचे भालाफेकपटू तुर्कीमध्ये बायोमेकेनिक्स तज्ञ क्लाउस बार्तोनिट्झ आणि फिजिओ ईशान मारवाह यांच्या मार्गदर्शनात सराव करत होते. दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेहून परतणार्यांमध्ये शिवपाल, अन्नू राणी, विपीन कसाना, अर्शदीप सिंग हे भालाफेकपटू, तसेच प्रशिक्षक उवे हॉन यांचा समावेश आहे.
नीरज आणि शिवपाल यावर्षी होणार्या टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र झाले आहेत.