नवी दिल्ली - भालाफेक खेळाडू नीरज चोप्रा याच्या नावाची राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे. भारतीय अॅथलेटिक्स महासंघाच्या समितीने हा निर्णय घेतला आहे. महत्वाची बाब म्हणजे, नीरज याचे नाव सलग दिसऱ्या वर्षी खेलरत्नसाठी पाठवण्यात आले आहे.
२२ वर्षीय नीरज ट्रॅक आणि फिल्डचा एकमात्र खेळाडू आहे. ज्याचे नाव भारतीय अॅथलेटिक्स महासंघाकडून सुचवण्यात आले आहे.
नीरज चोप्रा याने राष्ट्रमंडल आणि अशियाई स्पर्धेत सुवर्णपदाकाची कमाई केली आहे. त्याच्या या कामगिरीबद्दल त्याला २०१८ मध्ये अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. २०१८ आणि २०१९ या साली त्याचे नाव खेलरत्नसाठी पाठवण्यात आले होते.