महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

'लॉरियस वर्ल्ड ब्रेकथ्रू ऑफ द इयर' या पुरस्कारासाठी नीरज चोप्राला नामांकन जाहीर - कुस्तीपटू विनेश फोगट

भारतीय अॅथलिट नीरज चोप्रा (Indian Athletics Neeraj Chopra) याला 2022 साठी दिल्या जाणाऱ्या लॉरियस वर्ल्ड ब्रेकथ्रू ऑफ द इयर या पुरस्कारासाठी नामांकन जाहीर झाले आहे.

Neeraj Chopra
नीरज चोप्राला

By

Published : Feb 2, 2022, 5:09 PM IST

नवी दिल्ली:2022 साठी दिल्या जाणाऱ्या 'लॉरियस वर्ल्ड ब्रेकथ्रू ऑफ द इयर' (Laureus World Breakthrough of the Year) या पुरस्कारासाठी नामांकन जाहीर करण्यात आले आहे. या पुरस्कारासाठी एकूण सहा खेळाडूंना नामांकन मिळाले आहे. ज्यामध्ये एका भारतीय खेळाडूचा समावेश आहे. हे नाव दुसरे तिसरे कोणते नसून टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकूण देणाऱ्या नीरज चोप्राचे आहे.

त्याच्या व्यतिरक्त 2022 लॉरियस वर्ल्ड ब्रेकथ्रू ऑफ द इयर पुरस्कारासाठी नामांकन मिळालेल्या खेळाडूंमध्ये एम्मा रडुकानु, डॅनिल मेदवेदेव, पेद्री, युलिमार रोजास, एरियन टिटमस यांचा समावेश आहे.

२०१९ मध्ये कुस्तीपटू विनेश फोगट (Wrestler Vinesh Fogat) आणि २०००-२०२० लॉरियस स्पोर्टिंग मोमेंट अवॉर्ड जिंकणारा क्रिकेटर मेस्ट्रो, सचिन तेंडुलकर यांच्यानंतर लॉरियस पुरस्कारासाठी नामांकन मिळालेला नीरज चोप्रा केवळ तिसरा भारतीय खेळाडू आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details