मुंबई -टोकियो ऑलिम्पिकमधील सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा नेहमी सोशल मीडियावर चर्चेचा विषय असतो. यादरम्यान, त्याने डान्स+6 या रिअॅलटी शोमध्ये हजेरी लावली. या कार्यक्रमात होस्ट राघव जुयालसह इतर कंटेस्टेंट्सने नीरज चोप्राला मजेशीर प्रश्न विचारले. इतकेच नव्हे तर त्यांनी नीरजला डान्स करण्यास भाग पाडले.
नीरज चोप्राविषयी मुलींसह अनेक जण विविध बाबी सर्च करत आहे. याविषयी राघव जुयाल याने प्रश्न विचारले. यात नीरजचे लग्न आणि गर्लफ्रेंडविषयी देखील त्याने प्रश्न केला.
पुनित पाठक याने सर्व मुलींच्या वतीने नीरज चोप्राला विचारले की, त्याला कोणत्या प्रकारची मुलगी पसंद आहे. यावर राघव जुयाल तात्काळ म्हणाला की, भाल्यासारखी. यावर नीरज चोप्रा म्हणाला की, नाही नाही ती तर मग खूप उंच होईल. इतक्या उंचीचा काय करू.
नीरज पुढे म्हणाला की, मी खेळाडू आहे ती पण खेळाडू असेल तर उत्तम आहे. याशिवाय एकदुसऱ्याची रिस्पेक्ट असली पाहिजे. ही बाब खूप महत्वाची आहे. सोबत फॅमिलीची देखील रिस्पेक्ट असायला हवी. माझ्यासाठी ही बाब खूप गरजेची आहे. मला वाटत की, अशीच मुलगी बेस्ट असेल.