महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

Neeraj Chopra Declares : नीरज चोप्राने डायमंड लीग स्पर्धेसाठी फिट असल्याचे केले जाहीर - sports news

व्हिडीओ पोस्ट करताना नीरजने ( Golden Boy Neeraj Chopra ) लिहिले की, "हवामानासह कठीण परिस्थिती, पण कुओर्टेनमध्ये सीझनमधील माझा पहिला विजय मिळाल्याने आनंद झाला." मला बरे वाटत आहे आणि 30 जून रोजी बॉहॉस गॅलन येथे डायमंड लीग सीझनमदध्ये माझा प्रवास सुरू करण्यास उत्सुक आहे.

Neeraj Chopra
Neeraj Chopra

By

Published : Jun 19, 2022, 4:03 PM IST

नवी दिल्ली: भारताचा अव्वल भालाफेकपटू आणि 2020 टोकियो ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्राने ( Olympic gold medalist Neeraj Chopra ), 30 जून रोजी स्टॉकहोम येथे होणाऱ्या डायमंड लीग स्पर्धेत ( Diamond League competition in Stockholm ) सुवर्णपदक जिंकण्याचा आपला इरादा जाहीर केला. तसेच तो म्हणाला की, खराब हवामान असूनही तो आपले प्रशिक्षण सुरू ठेवत आहे.

पावो नूरमी ऍथलेटिक्स मीटमध्ये रौप्य पदक जिंकल्यानंतर आणि राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केल्यानंतर, चोप्राने शनिवारी फिनलंडमधील 2022 कुओर्टेन गेम्समध्ये पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेत 86.69 मीटरच्या प्रभावी थ्रोसह सुवर्णपदक ( Neeraj Chopra won gold medal Kuorten ) जिंकले.

24 वर्षीय चोप्रा, कुओर्टेन गेम्समध्ये पावसामुळे चिखलाच्या ट्रॅकची स्थिती समजून घेऊ शकले नाहीत आणि ते घसरले ( Neeraj Chopra fall in Finland ), त्यांना दुखापत झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात होता, परंतु चोप्राने रविवारी चिखलाच्या ट्रॅकवर स्वतःचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे.

व्हिडिओ पोस्ट करताना, त्याने लिहिले, "हवामानासह कठीण परिस्थिती, परंतु कुओर्टेन येथे हंगामातील माझा पहिला विजय मिळाल्याने आनंद झाला." मला बरे वाटत आहे आणि 30 जून रोजी बॉहॉस गॅलन येथे डायमंड लीग हंगाममध्ये माझ्या प्रवासाला सुरूवात करण्यास उत्सुक आहे. तसेच सर्वांनी दिलेल्या समर्थनासाठी धन्यवाद.

हेही वाचा -Ind Vs Sa 5th T20 : भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात आज निर्णायक सामना; रिषभ पंतला असणार 'या' विक्रमाची संधी

ABOUT THE AUTHOR

...view details