सांगली : सांगली जिल्हा क्रीडा संकुलाचे ( Sangli District Sports Complex ) छत्रपती शाहू महाराज असे नामकरण राष्ट्र विकास सेनेकडून करण्यात आले आहे. पहाटेच्या सुमारास राष्ट्रविकास सेनेकडून आंदोलन करत जिल्हा क्रीडा संकुलात नामकरण करण्यात आले आहे. या संकुलाला पैलवान हिंदकेसरी मारुती माने असे नाव देण्याची मागणी पुढे आली होती. आता राष्ट्र विकास सेनेकडून ( Rashtra Vikas Sena ) आंदोलन करत छत्रपती शाहू महाराज जिल्हा क्रीडा संकुल असं नामकरण करण्यात आले आहे.
Sangli District Sports Complex : राष्ट्र विकास सेनेकडून जिल्हा क्रीडा संकुलाला छत्रपती शाहू महाराजांचे नाव - Wrestler Hindkesari Maruti Man
राष्ट्र विकास सेनेकडून पहाटेच्या सुमारास सांगली जिल्हा क्रीडा संकुलाचे छत्रपती शाहू महाराज असे नामकरण ( Naming Chhatrapati Shahu Maharaj ) करण्यात आले आहे. या अगोदर संकुलाला पैलवान हिंदकेसरी मारुती माने असे नाव देण्याची मागणी पुढे आली होती.
राष्ट्र विकास सेनेकडून क्रीडा संकुलाचे नामकरण -
सांगली जिल्हा प्रशासनाच्या जिल्हा क्रीडा संकुलाचा नामांतराचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. काही दिवसांपूर्वी जिल्हा क्रीडा संकुलाला पैलवान हिंदकेसरी मारुती माने ( Wrestler Hindkesari Maruti Mane ) यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय विकास सेनेकडून थेट जिल्हा क्रीडा संकुलाचं नामकरण गनिमी काव्याच्या पद्धतीने करण्यात आले आहे. छत्रपती शाहू महाराज जिल्हा क्रीडा संकुल, असे नामकरण राष्ट्र सेनेच्या वतीने आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आले आहे. पहाटेच्या सुमारास राष्ट्रविकास सेनेच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा क्रीडा संकुलाच्या इमारतीवर चढून छत्रपती शाहू महाराज जिल्हा क्रीडा संकुल फलक लावला, तसेच छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्याची प्रतिष्ठापणा आणि आतिषबाजी करत जल्लोष साजरा केला.