नवी दिल्ली -क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांनी मंगळवारी भारताच्या राष्ट्रीय अँटी-डोपिंग एजन्सीचे (नाडा) पहिले मोबाईल अॅप बाजारात आणले आहे. खेळाडूंना खेळाविषयी आणि सर्वात महत्वाचे म्हणजे प्रतिबंधित पदार्थांबद्दल माहिती मिळावी, जेणेकरुन ते कोणतेही चुकीचे कार्य टाळतील, या उद्देशाने हे अॅप तयार करण्यात आले आहे.
रिजीजू म्हणाले, "या उपक्रमाबद्दल मी नाडाचे आभार मानतो. भारतीय खेळांसाठी ही एक महत्त्वाची पायरी आहे. कारण आपण स्वच्छ खेळासाठी काम करत आहोत. या उपक्रमाची पहिली पायरी म्हणजे लोकांना जागरूक करणे. कोणती औषधे घेऊ नयेत, हे खेळाडूंना कळण्यासाठी हे अॅप आहे."