महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

माझे ध्येय जागतिक क्रमवारी नाही तर ऑलिम्पिक पदक आहे - बजरंग पूनिया - target

क्रमवारीत प्रथम क्रमांक मिळवणे माझे ध्येय नसून माझ्या देशासाठी जास्ती जास्त पदक खासकरुन ऑलिम्पिक पदक जिंकणे हे माझे ध्येय असल्याचं बजरंग पूनियाने सांगितलं.

बजरंग पूनिया

By

Published : Jun 23, 2019, 8:58 PM IST

नवी दिल्ली - कुस्तीच्या ६५ किलो वजनी गटामध्ये जागतीक क्रमवारीत प्रथम क्रमांकावर भारतीय पहलवान बजरंग पूनियाने बाजी मारली आहे. यावर बोलताना पूनिया सांगितले की, जागतिक क्रमवारीत प्रथम क्रमांक पटकल्याचा आनंद होत आहे. मात्र, क्रमवारीत प्रथम क्रमांक मिळवणे माझे ध्येय नसून माझ्या देशासाठी जास्ती जास्त पदक खासकरुन ऑलिम्पिक पदक जिंकणे हे माझे ध्येय असल्याचं सांगितलं.

बजरंग पूनियाने एका वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, मला देशासाठी जास्तीत जास्त पदके जिंकावयाची आहेत. यासाठी मी प्रयत्नशील आहे. मी क्रमवारीबद्दल कधी विचार करत नाही. स्वतःला चांगला खेळाडू म्हणून सिध्द करण्यासाठी मी प्रयत्नशील असल्याचे त्यानं सांगितले. यूडब्ल्यूडब्ल्यूने जाहीर केलेल्या क्रमवारीत भारताचे १५ कुस्तीपटूंचा समावेश आहे. यापूर्वी कधीही भारताच्या कुस्तीपटूंनी पहिल्या १० नंबरमध्ये जागा मिळवली नव्हती. भारतात कुस्तीचा खेळ लोकप्रिय होत असून त्यामुळे भारतीय कुस्तीपटू क्रमवारीत चांगल्या नंबरवर असल्याचे पूनियाने सांगितले.

बजरंग पूनियाने मागील महिन्यात न्यूयार्कमधील मॅडिसन स्व्कायरमध्ये कुस्ती लढली होती. या कुस्तीत त्याला अमेरिकेचा कुस्तीपटू यिआनी दियाकोमिहालिसकडून ८-१० ने पराभव स्वीकारावा लागला होता. पराभवानंतरही बजरंग पूनिया मॅडिसन स्व्कॉयरमध्ये लढणारा पहिला भारतीय कुस्तीपटू ठरला.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details