नवी दिल्ली : मुंबई रणजी करंडक संघाचा माजी कर्णधार आणि टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू सुधीर नाईक यांची प्रकृती खालावल्याने त्यांना मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. सुधीर नाईक सध्या आयसीयूमध्ये असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. शुक्रवार, 24 मार्च रोजी सुधीर नाईक दादर येथील घरात पडल्याने बेशुद्ध झाले. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र आता त्यांची प्रकृती गंभीर होत आहे. प्रसिद्ध कॉमेडियन आणि भारतीय अभिनेते सतीश शाह यांनी ही माहिती दिली. सुधीर नाईक यांचे वय आता ७८ वर्षे आहे.
कॉमेडियन सतीश शाह यांनी ट्विटद्वारे केली पोस्ट :भारतीय कॉमेडियन सतीश शाह यांनी त्याच्या ट्विटर हँडलवरून एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये सतीश शाह माजी क्रिकेटपटू सुधीर नाईकसोबत दिसत आहेत. फोटोमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, सुधीर नाईक आयसीयू रूममध्ये बेडवर पडलेले आहेत आणि सतीश शहा त्यांच्या पलंगाच्या शेजारी उभे आहेत. हा फोटो मुंबईतील हिंदुजा हॉस्पिटलचा आहे. जेव्हा सतीश शाह सुधीर नाईक यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये पोहोचले होते.
सतीश शहा यांची भावनात्मक पोस्ट :सतीश शाह यांनी या फोटोला एक गोंडस कॅप्शनही दिले आहे. त्यांनी लिहिले आहे की, कृपया माझा प्रिय मित्र सुधीर नाईक माजी कसोटीपटू, मुंबई रणजी ट्रॉफी संघाचा कर्णधार सुधीर नाईक मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात दाखल आहे, यासाठी प्रार्थना करा. सतीश शहा यांनी आपल्या मित्राकरिता हाॅस्पिटलमध्ये जाऊन प्रत्यक्ष सर्व चौकशी केली, तेथील डाॅक्टरांकडून सर्व माहिती घेत इतर फाॅर्मलिटी पार पाडण्यासाठी सर्व सहकार्य केले.
सुधीर नाईक यांची क्रिकेट कारकिर्द :सुधीर नाईक यांनी सुनील गावसकर यांच्यासोबत क्रिकेट विश्वात पदार्पण म्हणजेच प्रथम डेब्यू केला होता. माजी क्रिकेटपटू आणि समालोचक सुनील गावस्कर यांनी सुधीर नाईक यांच्यासोबत 1974 मध्ये इंग्लंडविरुद्धच्या आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये साथ दिली होती. या सामन्यात सुधीर नाईकने सुनील गावसकरसोबत सलामी दिली. मात्र, या सामन्यात सुधीरची कामगिरी फारशी चांगली झाली नाही. या डावात त्याने 19 चेंडूंचा सामना करताना केवळ 4 धावा केल्या आणि त्यानंतर सुधीर लवकरच पॅव्हेलियनमध्ये परतला. या कसोटीच्या दुसऱ्या डावात त्याने शानदार फलंदाजी करताना 165 चेंडूत 9 चौकार मारत 77 धावा केल्या. मात्र, या सामन्यात इंग्लंडने भारताचा ७८ धावांनी पराभव केला. याशिवाय सुधीरने मुंबई रणजी संघाचीही कमान सांभाळली आहे. यासोबतच नॅशनल क्रिकेट क्लबच्या कोटची भूमिकाही बजावली आहे.
हेही वाचा : Virat Kohli Shares a Romantic Message : विराटने रोमँटिक मेसेज लिहून पत्नी अनुष्कासोबतचा सुंदर फोटो केला शेअर, चाहते झाले भावुक