महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

मुंबई मॅरेथॉन २०२० : इथिओपियाच्या धावपटूंचे वर्चस्व, जाणून घ्या विजेते...

बहुचर्चित मुंबई मॅरेथॉन स्पर्धेत इथिओपियाच्या स्पर्धकांनी आपला दबदबा कायम ठेवला. पुरुष गटामध्ये इथिओपियाच्या तब्बल सहा धावपटूंनी अव्वल दहामध्ये स्थान मिळविताना पहिल्या तिन्ही स्थानांवर कब्जा केला.

Mumbai Marathon 2020
मुंबई मॅरेथॉन २०२० : इथिओपियाच्या धावपटूंचे वर्चस्व, जाणून घ्या विजेते...

By

Published : Jan 20, 2020, 10:30 AM IST

मुंबई- बहुचर्चित मुंबई मॅरेथॉन स्पर्धा रविवारी मुंबईत पार पडली. तब्बल ५५ हजाराहून अधिक स्पर्धकांनी यामध्ये भाग घेतला होता. मुंबई मॅरेथॉनच्या स्पर्धेत इथिओपियाच्या स्पर्धकांनी आपला दबदबा कायम ठेवला. पुरुष गटामध्ये इथिओपियाच्या तब्बल सहा धावपटूंनी अव्वल दहामध्ये स्थान मिळविताना पहिल्या तिन्ही स्थानांवर कब्जा केला. तर महिलांमध्येही सुवर्ण आणि कांस्यपदक इथिओपियाच्या धावपटूंनी जिंकले, केनियन धावपटूला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.

मुख्य मॅरेथॉनचे विजेते -

  • ४२ किलोमीटरच्या मुख्य मॅरेथॉनमध्ये आंतराष्ट्रीय स्पर्धकांनी भाग घेतला होता. ज्यामध्ये देरारा हुरीसाने २ तास ८ मिनिटे ८ सेकंद असी वेळ नोंदवत प्रथम क्रमांक पटकावला. एली अबशेरो याने २ तास ८ मिनिटे २० सेकंदांमध्ये ही स्पर्धा पूर्ण केली. तर तिसऱ्या स्थानावर असलेल्या बिर्हानू तोशेमने स्पर्धा पूर्ण करण्यासाठी २ तास ८ मिनिटे २६ सेकंद वेळ घेतला. या गटातील विजेतेपद इथिओपियाच्या खेळाडूंनी जिंकले.

मुख्य स्पर्धा महिला गटातील विजेते -

  • महिलांच्या गटामध्ये अमाने बेरीसो या इथिओपियाच्या स्पर्धकाने २ तास २४ मिनिटे ५१ सेकंदांत ही स्पर्धा पूर्ण करत पहिला क्रमांक पटकावला. दुसऱ्या स्थानावर असलेल्या रोधह जेपकोरीर या केनियाच्या स्पर्धकाने २ तास २७ मिनिटे १४ सेकंदात स्पर्धा पूर्ण केली. हावेन हैलू या इथिओपियाच्या स्पर्धकाने २ तास ३८ मिनिटे व ५६ सेकंदात ही स्पर्धा पूर्ण केली.

भारतीय एलिट पुरुष गटातील विजेते -

  • भारतीय एलिट पुरुष गटामध्ये श्रेनु बूगाता याने २ तास १८ मिनिटांचा वेळ घेत ही स्पर्धा पूर्ण केली आहे. तर दुसर्‍या स्थानावर शेर सिंगला स्पर्धा पूर्ण करण्यासाठी २ तास २४ मिनिटांचा वेळ लागला. तर तिसऱ्या स्थानावर आलेल्या दुर्गा बहादुर बुद्धा याने २ तास २४ मिनिट ३ सेकंदांमध्ये ही मॅरेथॉन पूर्ण केली.

भारतीय महिलांच्या गटातील विजेते -

  • भारतीय महिलांच्या गटामध्ये सुधा सिंगने २ तास ३६ मिनिटे ५१ सेकंद घेत पहिले क्रमांक पटकावले. तर दुसर्‍या स्थानावर असलेल्या ज्योती गवत हिने २ तास ४० मिनिटे १४ सेकंदांचा वेळ घेतला. तिसऱ्या स्थानावर असलेल्या शामली सिंग हिने तब्बल २ तास ५८ मिनिटं ४४ सेकंदामध्ये ही मॅरेथॉन पूर्ण केली.

भारतीय महिला अर्ध-मॅरेथॉनचे विजेते -

  • भारतीय महिला अर्ध मॅरेथॉनमध्ये पारुल चौधरीने १ तास १५ मिनिटे ३७ सेकंदांमध्ये प्रथम क्रमांक पटकावला असून आरती पाटील हिने तब्बल १ तास १७ मिनिटे ३ सेकंदांमध्ये हाफ मॅरेथॉन पूर्ण केली. तर मोनिका आथरे हिने १ तास १८ मिनिटे ३३ सेकंदांमध्ये हाफ मॅरेथॉन पूर्ण केली आहे.

हे आहेत भारतीय पुरुष एलिट हाफ मॅरेथॉनचे विजेते -

  • भारतीय पुरुष एलिट हाफ मॅरेथॉनमध्ये तीर्थ पुन या स्पर्धकाने १ तास ५ मिनिटे ३९ सेकंदांचा वेळ घेत स्पर्धा पूर्ण केली. तर मानसिंग याने १ तास ६ मिनिटे ६ सेकंदांमध्ये हाफ मॅरेथॉन पूर्ण केली. बलीअप्पा याने तिसऱ्या स्थानासाठी १ तास ७ मिनिटे ११ सेकंदाचा वेळ नोंदवला.

ABOUT THE AUTHOR

...view details