मुंबई - भारताची युवा खेळाडू आणि मराठमोळ्या अपूर्वा पाटीलने इंग्लंडमध्ये धडाका उडवला आहे. नुकत्याच झालेल्या राष्ट्रकुल ज्युडो चॅम्पियनशिप स्पर्धेत तिने सुवर्णपदक पटकावले. महिलांच्या ७० किलोग्रॅमपेक्षा अधिक वजनी गटात तिने ही कामगिरी केली.
हेही वाचा -VIDEO : रोहित शर्मा नहीं 'ग्रेट रोहित शर्मा', पाकचा माजी वेगवान गोलंदाज हिटमॅनच्या प्रेमात
अपूर्वाने यजमान इंग्लंडच्याच मेगन डग्लसला पराभूत करत सुवर्णपदक जिंकले. मागच्या वर्षी मकाऊ आणि लेबनान येथे झालेल्या आशियाई ज्युडो चॅम्पियनशिप स्पर्धेतील प्रदर्शनामुळे अपूर्वाला यंदाच्या राष्ट्रकुल ज्युडो चॅम्पियनशिप स्पर्धेत स्थान मिळाले होते. जानेवारीमध्ये खेळल्या गेलेल्या खेलो इंडिया यूथ स्पर्धेत तिने सुवर्णपदक जिंकले होते.
अपूर्वा सध्या १२वी इयत्तेमध्ये शिकत असून ती २००९ पासून ज्युडो स्पर्धेत भाग घेत आहे. १५ वर्षाच्या आतील स्पर्धेत तिने अनेक पदके पटकावली आहेत. अपूर्वाचे वडील पोलीस प्रशासनात कार्यरत आहेत.