जालंधर -हरियाणाची ३५ वर्षांची 'सुपरमॉम' अनिता श्योराणने टाटा मोटर्स वरीष्ठ गट कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक पटकावत सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. अनिताने राष्ट्रकुल कांस्यपदक विजेती दिव्या काकरान ६८ किलो वजनी गटात पराभूत केले. तर, भारताची स्टार महिला कुस्तीपटू विनेश फोगटने हरियाणाच्या अंजूला ७-३ अशा फरकाने पराभूत करत राष्ट्रीय स्पर्धेतील आपले सलग दुसरे सुवर्णपदक मिळवले.
राष्ट्रकुल विजेत्या कुस्तीपटूला एका मुलाची आई असलेल्या कुस्तीपटूनं दिली मात...! - टाटा मोटर्स वरिष्ट राष्ट्रीय कुस्ती चॅम्पियनशिप न्यूज
महाराष्ट्राच्या रेश्मानेही चमकदार कामगिरी करत ६२ किलो वजनी गटात कांस्यपदक पटकावले आहे. उत्तर प्रदेशच्या फ्रीडम यादवला रेश्माने नमवत ही कामगिरी केली आहे. रिओ ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या साक्षीने ६२ किलो वजनी गटात हरयाणाच्या राधिकाला ४-२ असे हरवत सुवर्णपदक जिंकले आहे.
राष्ट्रकुल विजेत्या कुस्तीपटूला एका मुलाची आई असलेल्या कुस्तीपटूनं दिली मात...!
महाराष्ट्राच्या रेश्मानेही चमकदार कामगिरी करत ६२ किलो वजनी गटात कांस्यपदक पटकावले आहे. उत्तर प्रदेशच्या फ्रीडम यादवला रेश्माने नमवत ही कामगिरी केली आहे. रिओ ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या साक्षीने ६२ किलो वजनी गटात हरयाणाच्या राधिकाला ४-२ असे हरवत सुवर्णपदक जिंकले आहे.
या स्पर्धेत हरियाणाच्या मुलींनी दमदार कामगिरीचे प्रदर्शन करत गुणतालिकेत आघाडी मिळवली आहे.