गोंदिया - येथील कर्तव्य अभियान टीमने प्रथमच गोंदिया येथे सायक्लथॉन स्पर्धेचे आयोजन केले आहे. गोंदिया जिल्ह्यासह भंडारा, नागपूर जिल्ह्यातील स्पर्धकांनी तसेच शालेय विद्यार्थ्यांनी आणि शेकडो मुलींनी मोठ्या संख्येने या स्पर्धेत सहभाग घेतला.
गोंदियात रंगली सायक्लथॉन स्पर्धा, ३ हजारांपेक्षा जास्त स्पर्धकांनी नोंदवला सहभाग - कर्तव्य अभियान सायक्लथॉन गोंदिया न्यूज
दिवसेंदिवस वाढत चाललेले प्रदूषण आणि त्याचा मानवी जीवनावर होणारा दुष्परिणाम या सर्वांना मात देण्यासाठी आणि खेळाकडे आकर्षित करण्यासाठी ही स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेचे आयोजन इंदिरा गांधी स्टेडियममध्ये करण्यात आले.
हेही वाचा -VIDEO : 'मी माझ्या मुलीला आरती करताना पाहिलं आणि टीव्हीच फोडून टाकला' - शाहिद आफ्रिदी
दिवसेंदिवस वाढत चाललेले प्रदूषण आणि त्याचा मानवी जीवनावर होणारा दुष्परिणाम या सर्वांना मात देण्यासाठी आणि खेळाकडे आकर्षित करण्यासाठी ही स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेचे आयोजन इंदिरा गांधी स्टेडियममध्ये करण्यात आले. गोंदिया येथे ३ दिवसीय ऑल इंडिया सायकल पोलो स्पर्धा घेण्यात आली असून २६ राज्यातील ७०० मुलींनी सहभाग घेतला होता. यापूर्वी मागील वर्षी गोंदियाचे तत्कालीन पोलीस अधीक्षक हरीश बैझल यांनी गांधी जयंतीचे औचित्य साधून 'अहिंसा दौड'चे आयोजन केले होते.