नवी दिल्ली : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात नागपुरात सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा धुव्वा उडवत 91 धावांवर ऑलआऊट केले. या सामन्यात मोहम्मद शमीने 37 धावांची तुफानी खेळी केली. शमीने या डावात शानदार फलंदाजी करीत तीन षटकार ठोकले. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत मोहम्मद शमीने आता राहुल द्रविडसुद्धा मागे टाकले आहे. इतकेच नाही, तर शमी याबाबतीत अनेक भारतीय दिग्गजांच्याही पुढे गेला आहे. त्याने अनेक भारतीय फलंदाजांना मागे टाकले आहे.
माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांना टाकले मागे :भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी टीम इंडियासाठी 164 कसोटी सामन्यांमध्ये 13,288 धावा केल्या आहेत. राहुल द्रविडने कसोटी फॉर्मेटमध्ये 36 शतके आणि 63 अर्धशतके केली आहेत. या कसोटी क्रिकेटमध्ये राहुल द्रविडच्या नावावर फक्त २१ षटकार आहेत. त्याच वेळी, त्याने 344 एकदिवसीय सामन्यांमध्ये 10,889 धावा केल्या आणि त्यात 12 शतके झळकावली. टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने कसोटी फॉरमॅटमध्ये फलंदाजी करताना केवळ 772 धावा केल्या आहेत. मात्र, या फॉरमॅटमध्ये मोहम्मद शमीने 23 षटकार ठोकले आहेत.
कसोटीमध्ये वीरेंद्र सेहवाहगचे सर्वाधिक षटकार :या खेळाडूंनी कसोटीत मारलेल्या सर्वाधिक षटकारमध्ये वीरेंद्र सेहवागने टीम इंडियासाठी सर्वाधिक षटकार ठोकले आहेत. वीरेंद्र सेहवाहने कसोटी फॉरमॅटमध्ये 104 सामन्यांच्या 180 डावांमध्ये 91 षटकार ठोकले आहेत. यानंतर एमएस धोनीने दुसऱ्या क्रमांकावर कसोटी क्रिकेटमध्ये 78 षटकार ठोकले आहेत.