महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

सलाम मातृत्वाला..! लाईव्ह सामन्यादरम्यान महिला खेळाडूने बाळाला पाजलं दूध, फोटो व्हायरल

मिझोराममध्ये सोमवारी एक व्हॉलीबॉल सामना खेळवला जात होता. सामन्यादरम्यान पंचांनी हाफटाईमचा हूटर वाजवताच सामन्यात सहभागी एक खेळाडू मैदानाबाहेर पोहोचली आणि आपल्या बाळाला दूध पाजू लागली. हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लालवेंटुआंगीचे हे चित्र सोशल मीडियावर फेसबुक यूजर निंगलुन हंगल यांनी शेअर केले आहे.

Mizoram volleyball player breastfeeds her child in between game, picture wins hearts on social media
मातृत्वाला सलाम..! लाईव्ह सामन्यादरम्यान महिला खेळाडूने बाळाला पाजलं दूध, फोटो व्हायरल

By

Published : Dec 10, 2019, 7:10 PM IST

मिझोराम - सध्या मिझोराममध्ये स्टेट गेम्स २०१९ स्पर्धा सुरू असून या स्पर्धेतील एक व्हॉलीबॉलचा सामना चर्चेत आला आहे. या सामन्यात एक महिला खेळाडूने आपल्या बाळाला स्तनपान करण्यासाठी सामना थांबवला. या प्रसंगाने केवळ प्रेक्षकांचे नाही तर सोशल मीडियावरही चाहत्यांची मने जिंकली.

मिझोराममध्ये सोमवारी एक व्हॉलीबॉल सामना खेळवला जात होता. सामन्यादरम्यान पंचांनी हाफटाईमचा हूटर वाजवताच सामन्यात सहभागी एक खेळाडू मैदानाबाहेर पोहोचली आणि आपल्या बाळाला दूध पाजू लागली. हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लालवेंटुआंगीचे हे चित्र सोशल मीडियावर फेसबुक यूजर निंगलुन हंगल यांनी शेअर केले आहे.

शेअर केलेल्या फोटोला हंगल यांनी 'लाईव्ह सामन्यात ७ महिन्यांच्या बाळाला दूध पाजण्यासाठी थांबवला सामना', कॅप्शन लिहिले आहे. दरम्यान, हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटीझन्सनी खेळाडू आणि आई होण्याची दुहेरी जबाबदारी अशी पार पाडली जाते, अशा शब्दात 'ती'चे कौतुक केले आहे.

महत्वाची बाब म्हणजे, हंगल यांनी शेअर केलेला फोटो मिझोरामच्या क्रीडामंत्र्यांपर्यंत पोहोचला. त्यानंतर मिझोरामचे क्रीडामंत्री रॉबर्ट रोमाव्हिया रॉयटे यांनी लालवेंटुआंगीला १० हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याचे ठरविले. रॉयटे यांनी आपल्या ट्विटरवरुन ही मदत घोषित केली आहे.

हेही वाचा -रशियाला 'वाडा'चा दणका, ऑलिम्पिकसह फुटबॉल विश्वकरंडकातून पत्ता कट

हेही वाचा -'आम्ही कोणत्याही संघाला घाबरत नाही, लढतीसाठी सज्ज'

ABOUT THE AUTHOR

...view details