कोलकाता - भारताची महिला वेटलिफ्टिंगपटू मीराबाई चानूने राष्ट्रीय वेटलिंफ्टिंग चॅम्पियनशीपमध्ये २०३ किलो वजन उचलत सुवर्णपदक जिंकले. तिने ४९ किलो वजनी गटात स्वत:चाच विक्रम मोडित काढत नव्या विक्रम नोंदवला.
मणिपूरच्या २५ वर्षीय मीराबाईने स्नैचच्या दुसऱ्या प्रयत्नात ८७ किलो वजन उचलले, तर क्लीन आणि जर्कमध्ये ११५ किलो वजनासह तिने एकूण २०३ किलो वजन उचलले. याआधी तिने थायलंड विश्व चॅम्पियनशीपमध्ये २०१ किलो वजन उचलले होते.
मीराबाई चीनच्या जियांग हुईहुआ (२१२), हाऊ झीहुई (२११) आणि कोरियाच्या की री सोंगनंतर (२०९) जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानावर पोहोचली आहे.