लंडन -हेवीवेट चॅम्पियन आणि दिग्गज बॉक्सिंगपटू माइक टायसन १५ वर्षानंतर पुन्हा रिंगमध्ये उतरणार आहेत. ५४ वर्षीय टायसन यांचा सामना ५१ वर्षीय रॉय जोन्सशी २८ नोव्हेंबरला होणार आहे. कॅलिफोर्निया अॅथलेटिक कमिशनने पुढील महिन्यात टायसन आणि जोन्स यांच्यात होणाऱ्या सामन्यास प्रदर्शनीय सामना म्हणून मान्यता दिली आहे.
प्रदर्शनीय सामना नाही -
टायसन म्हणाले, ''हा खरा सामना नाही का? हा माइक टायसन विरुद्ध रॉय जोन्स यांच्यातील सामना आहे. मी सामन्यासाठी येत आहे आणि तेही येत आहेत. आपल्याला एवढेच माहित असणे आवश्यक आहे.'' १९८६मध्ये टायसन यांनी वयाच्या २०व्या वर्षी ट्रेवर बेबरिकला हरवत जगातील सर्वात तरुण हेवीवेट चॅम्पियनचा विक्रम रचला होता. त्यांनी आपल्या कारकिर्दीत ५८ पैकी ५० सामने जिंकले आहेत.